Sakal Vastu Property Expo : बाणेरमध्ये ‘सकाळ वास्तू प्रॉपर्टी एक्स्पो’

घर शोधण्यासाठी मदतीचा ठरणाऱ्या दोन दिवसीय ‘सकाळ वास्तू प्रॉपर्टी एक्स्पो’ शनिवार (ता. १०) आणि रविवारी (ता. ११) आयोजन करण्यात आला आहे.
Sakal Vastu Property Expo 2022
Sakal Vastu Property Expo 2022Sakal
Updated on
Summary

घर शोधण्यासाठी मदतीचा ठरणाऱ्या दोन दिवसीय ‘सकाळ वास्तू प्रॉपर्टी एक्स्पो’ शनिवार (ता. १०) आणि रविवारी (ता. ११) आयोजन करण्यात आला आहे.

पुणे - पायाभूत सुविधांपासून चांगले जीवन जगण्यासाठी आवश्‍यक असलेल्या सर्वच बाबी उपलब्ध असल्याने पश्चिम पुण्यात घर खरेदी करण्यास अनेकांची पसंती मिळत आहे. मात्र या भागात नामांकित व्यावसायिकांचे प्रकल्प नेमके कोणत्या ठिकाणी आहेत? त्या प्रकल्पांची वैशिष्ट्ये काय आहेत याची माहिती सहजासहजी उपलब्ध होत नाही. घर खरेदीस इच्छुक असलेल्यांची ही अडचण आता ‘सकाळ वास्तू प्रॉपर्टी एक्स्पो’च्या माध्यमातून दूर होणार आहे.

पश्चिम पुण्यातील विविध प्रकल्पांची माहिती या एक्स्पोमध्ये एकाच ठिकाणी मिळणार आहे. घर शोधण्यासाठी मदतीचा ठरणाऱ्या दोन दिवसीय ‘सकाळ वास्तू प्रॉपर्टी एक्स्पो’ शनिवार (ता. १०) आणि रविवारी (ता. ११) आयोजन करण्यात आला आहे. बाणेर रोडवरील माऊली गार्डन, बाणेर रोड, सर्वे. नं. २७४/ २, भारत पेट्रोलियम पंपाजवळ येथे हा एक्स्पो पार पडणार आहे. पश्चिम पुण्याचा केंद्रबिंदू ठरलेल्या बाणेर भागात दुसऱ्यांदा या एक्स्पोचे आयोजन करण्यात येते आहे. आपल्या व कुटुंबाच्या गरजा पूर्ण करेल असे घर कुठे मिळेल?, सर्व सुविधा संपन्न गृहप्रकल्प कोणते? या व अशा अनेक शंकाचे निरसन या एक्स्पोत होणार आहे.

एक्स्पोमध्ये फ्लॅट, बंगलो, रोहाऊस, रिडेव्हलपमेंट प्रकल्पातील आरामदायी सदनिकांसह एन.ए. प्लॉटचे विविध पर्याय ग्राहकांसाठी उपलब्ध असणार आहेत. इच्छुक घर खरेदीदारांना त्यांच्या आवाक्यातील किमतीत, हवे तेवढ्या मोठ्या व आरामदायी घरांचे पर्याय या एक्स्पोच्या माध्यमातून उपलब्ध होणार आहेत. आपल्या हक्काचे घर साकारण्याची वाट पाहत असलेल्या ग्राहकांना तातडीने निर्णय घेण्यासाठी हा एक्स्पो महत्त्वाचा ठरणार आहे. त्यामुळे घर घेण्याची सुवर्णसंधी साधण्याची हीच योग्य वेळ आहे, असे मत बांधकाम व आर्थिक क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केले. या ‘सकाळ वास्तु प्रॉपर्टी एक्स्पो’चे फायनान्स पार्टनर बँक ऑफ महाराष्ट्र आहे.

हे लक्षात ठेवा...

कधी : शनिवार रविवार (१० आणि ११ डिसेंबर)

कुठे : माउली गार्डन, बाणेर रस्ता, सर्वे. नं. २७४/२, भारत पेट्रोलियम पंपाजवळ, बाणेर

एक्स्पोची वेळ : सकाळी १० ते रात्री ८

प्रदर्शनात सहभागी विकसक : २० हून अधिक

प्रकल्पांची संख्या : ६० हून अधिक

पार्किंग : विनामूल्य

संपर्क : जय- ९७६४६७२४३१

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.