पुणे : घरकामगार महिलांचा पगार आला निम्म्यावर...!

घरकामगार महिलांच्या रोजगारात ५० टक्क्यांनी झाली घट
Maid women
Maid womensakal
Updated on

पुणे : ‘‘कोरोनापूर्वी जवळपास नऊ ते दहा घरांमध्ये (housemaid)काम करत होते. त्यावेळी सकाळी सहा वाजता घराबाहेर पडल्यावर थेट दुपारी तीन वाजल्यानंतर घरी परतत असे. परंतु कोरोना (Corona) आला आणि आमचा रोजगार गेला. गेल्या दोन वर्षांत संसाराची घडी विस्कटली आता कितीही प्रयत्न केले तरी ही घडी पुन्हा बसविणे अशक्य होतंय. रोजगार निम्म्यावर आला असून आता मिळेल ते काम मिळेल त्या मोबदल्यात करावे लागत आहे."

Maid women
जातिवाचक शिविगाळप्रकरणी इंदापूरमधील दोघांना कारावास

मार्च २०२०मध्ये कोरोनाच्या संसर्गामुळे शाळा, महाविद्यालये बंद झालीत, तशीच त्यावेळेपासून घरकाम करणाऱ्या महिलांचे कामही थांबले. सुरवातीच्या सहा-सात महिने या हजारो महिला कामापासून वंचित होत्या. परिणामी घर चालविणे अवघड होऊन बसले. कोरोनाची पहिला लाट ओसरल्यानंतर काहींनी पुन्हा घरकाम करणाऱ्या महिलांना कामावर बोलावून घेतले. परंतु ही संख्याही नगण्य आहे. परिणामी कोरोनापूर्वी आठ ते बारा घरकामे असणाऱ्या एखाद्या महिलेला आता कुठे जेमतेम तीन ते चार कामे मिळत आहेत. परिणामी या महिलांच्या एकूण रोजगारात तब्बल ५० टक्क्यांपेक्षा अधिक घट झाल्याचे दिसून येते. पुण्यात घरकामगार महिलांची संख्या जवळपास दीड ते पावणे दोन लाख असण्याची शक्यता आहे. आता पुन्हा कोरोनाच्या तिसऱ्या लाटेने डोकेवर काढल्याने या घरकामगार महिलांची धास्ती आणखी वाढली आहे.

Maid women
बहिणीच्या आत्महत्येचा सूड, एकाच कुटुंबातील तिघींची हत्या; दोघांना मरेपर्यंत कारावास

‘‘कोरोनापूर्वी मला एकूण आठ ते नऊ घरकामे होती. सकाळी घरातून बाहेर पडल्यानंतर दुपारनंतरच घर गाठायचे. त्यावेळी मिळणाऱ्या मोबदल्यात घर कसेबसे चालायचे. परंतु कोरोना काळात साधारणत: गेल्या दोन वर्षांपासून रोजगार निम्म्याने कमी झाला आहे. आता जेमतेम दोन घरची कामे आहेत. एवढ्या कमी रोजगारात घर चालविण्यासाठी मोठी कसरत करावी लागते.’’

- प्रेमा आल्हाट, घरकाम करणाऱ्या महिला

‘‘आतापूर्वीप्रमाणे नियमित कामे मिळतील की नाही, कामाची हमी मिळेल का, असे असंख्य प्रश्न घरकामगार महिलांना भेडसावत आहेत. कोरोनाकाळात अनेकांनी कामावरून हकालपट्टी केल्याचे वास्तव आहे. त्यामुळे या महिलांचा रोजगार निम्म्यावर आला आहे. परिणामी त्यांचे अर्थकारण बिघडले आहे. मुलांचे शिक्षण, कुटुंबाचे आरोग्य, कामाची हमी अशा समस्यांनी या महिला त्रस्त झाल्या आहेत.’’

- शारदा वाडेकर, मोलकरीण पंचायत, पुणे जिल्हा

घरकामगार महिलांसाठी हवी ‘शहरी रोजगार हमी योजना’

‘‘घरकाम करणाऱ्या महिलांमध्ये गेल्या दोन वर्षात रोजगाराची समस्या मोठ्या प्रमाणात भेडसावत आहे. ही समस्या सोडविण्यासाठी राज्य सरकारने, स्थानिक स्वराज्य संस्थेने पुढाकार घ्यायला हवा. (Pune News)

Maid women
आपल्याला ओमिक्रॉनचा संसर्ग झाला तर नक्की काय करायला हवे जाणून घ्या..

केवळ घरकाम हे एवढेच क्षेत्र मर्यादित न ठेवता या महिलांच्या रोजगारासाठी ‘शहरी रोजगार हमी योजना’ कार्यान्वित करणे गरजेचे आहे. त्याशिवाय इतर कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रम राबविता येतील. या महिलांची शहरी पातळीवर नोंदणी करणे गरजेचे आहे.’’

- किरण मोघे, अध्यक्ष, पुणे जिल्हा घरकामगार संघटना

घरकामगार महिलांचे प्रश्न :

  • कोरोनात रोजगार आला निम्म्यावर

  • ५० ते ६० टक्के कामे गेली

  • मिळेल त्या मोबदल्यात काम करावे लागतंय

  • मुलांच्या ऑनलाइन शिक्षणासाठी उपलब्ध नाहीत साधने

  • आता पुढील काळातही कामाची नाही हमी

घरकामगार महिलांचे प्रश्न सोडविण्यासाठी असे आहेत पर्याय :

  • हवी ‘शहरी रोजगार हमी योजना’

    महिलांसाठी हवे कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रम

  • मुलांच्या ऑनलाइन शिक्षणासाठी मनपाने सोय उपलब्ध करून द्यावी

  • शहर पातळीवर क्षेत्रीय कार्यालयामार्फत या महिलांची हवी नोंदणी

  • महिलांना पर्यायी व्यवस्था म्हणून व्यवसायावर आधारित प्रशिक्षण मिळावेे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.