नागरिक, विविध पक्षांचे पदाधिकारी, व्यापारी, कामगार यांनी अनेकदा तक्रारी केल्या आहेत.
मार्केट यार्ड : आंबेडकर नगर, बटाटा शेड, गुराचा बाजार या परिसरात मागील अनेक दिवसापासून ड्रेनेज लाईन फुटल्यामुळे सर्वत्र दुर्गंधीयुक्त पाणी पसरले आहे. हे दुर्गंधीयुक्त पाणी भाजीपाला, फळे मार्केट, भुसार मार्केट मध्ये जात आहे. पुणे शहराला पुरवठा होणाऱ्या फळ-भाजीपाला, अन्नधान्याच्या संपर्कात येत असल्याने रोगराई पसरण्याची भीती निर्माण झाली आहे.
या भागातील नागरिक, विविध पक्षांचे पदाधिकारी, व्यापारी, कामगार यांनी अनेकदा तक्रारी केल्या आहेत. तरीही महापालिका प्रशासनाला मात्र जाग येताना दिसत नाही. त्यामुळे महापालिकेच्या हद्दीतील वस्त्या आणि सोसायट्यांचे ड्रेनेजचे घाण पाणी बाजार समितीच्या जागेत येत आहे. अनेक ठिकाणी शेतमाल त्याच ठिकाणी विकला जात आहे. त्यामुळे खरेदीसाठी येणाऱ्या ग्राहकांना हा माल विकत घ्यावा की नाही प्रश्न निर्माण होत आहे.
ड्रेनेजच्या घाण पाण्यात पार्कींग व्यवस्था
ड्रेनेजच्या घाण पाण्यामुळे बाजारात अनेक ठिकाणी घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. त्याच घाणीत गेट नंबर ४ ला असलेली पार्कींग आहे. त्यामुळे येथे येणाऱ्या जाणाऱ्या खरेदीदार, व्यापारी, कामगारांना दुर्गंधीयुक्त घाण पाण्यात गाडी लावून जावे लागत आहे. महापालिकेच्या आडमुठेपणामुळे मागील अनेक दिवसांपासून हे घाण पाणी येत आहे. त्याचे तत्काळ काम करून घेण्याची मागणी नागरीक करत आहेत.
ड्रेनेज लाईन बदलण्याची गरज
या भागातील ड्रेनेज लाईन या छोट्या आणि जुन्या आहेत. वरतून येणारे पाणी नाल्यामध्ये मावत नाही. त्यामुळे ते पाणी नाल्यात न जाता वरतून वाहत खाली येत आहे. यासाठी या भागातील संपूर्ण ड्रेनेज लाईन बदलून ती मोठी टाकण्याची गरज आहे. परंतु हा खर्च महापालिका करायला तयार नाही. त्याचा त्रास मात्र मार्केट यार्डातील व्यापारी, ग्राहकांना होत आहे.
प्रेमनगर, आंबेडकर नगर, स्वप्नपूर्ती सोसायटी, केंजळे नगर येथील रहिवाश्यांच्या सोईकरिता पूर्वीच्या ड्रेनेज लाईन या बाजार समिती आवारातून गेलेल्या आहेत. त्या जुन्या कमी क्षमतेच्या आणि नादुरुस्त आहेत. मोठ्या क्षमतेच्या ड्रेनेज लाईन टाकण्यासाठी सुमारे दोन कोटी रुपयांचा खर्च आहे. महापालिकेच्या विकास कामांसाठी बाजार समिती खर्च करू शकत नाही.
- मधुकांत गरड, प्रशासक
याबाबत बाजार समिती आणि महापालिका क्षेत्रिय कार्यालय, ड्रेनेजचा मुख्य विभाग अशी संयुक्त बैठक झाली आहे. यामध्ये दुरुस्तीच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
- अविनाश सपकाळ, विभागीय उपआयुक्त, पुणे महानगरपालिका
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.