Police Memorial Day : पोलिस स्मृती दिनानिमित्त हुतात्मा स्मृती स्मारकाला अभिवादन

धारातीर्थी पडलेल्या पोलिस दलातील शहीद अधिकारी, कर्मचाऱ्यांना पोलिस स्मृतिदिनानिमित्त महाराष्ट्र राज्य पोलिस संशोधन केंद्र (सीपीआर) येथील पोलिस हुतात्मा स्मृती स्मारकावर पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
Police Memorial Day
Police Memorial Daysakal
Updated on

पुणे - मागील वर्षभरात कर्तव्य बजावताना धारातीर्थी पडलेल्या पोलिस दलातील शहीद अधिकारी, कर्मचाऱ्यांना पोलिस स्मृतिदिनानिमित्त महाराष्ट्र राज्य पोलिस संशोधन केंद्र (सीपीआर) येथील पोलिस हुतात्मा स्मृती स्मारकावर पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचे कमांडंट वाइस एडमिरल अजय कोच्छर, पुणे पोलिस आयुक्त रितेश कुमार, पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे, कारागृह पोलिस महासंचालक अमिताभ गुप्ता, बिनतारी संदेश विभागाचे पोलिस महासंचालक सुनील रामानंद, सेवानिवृत्त पोलिस महासंचालक प्रवीण दीक्षित, राजेंद्र सिंग, अतिरिक्त महासंचालक भगवंतराव मोरे यांनी यांनी हुतात्मा स्मारकाला पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले.

या वेळी पोलिस सहआयुक्त संदीप कर्णिक, महाराष्ट्र इंटेलिजन्स अॅकेडमीचे विशेष पोलिस महानिरीक्षक राजेंद्र डहाळे, कारागृह पोलिस महानिरीक्षक जालिंदर सुपेकर, अतिरिक्त पोलिस आयुक्त रामनाथ पोकळे, रंजनकुमार शर्मा, प्रवीणकुमार पाटील, अरविंद चावरिया, वसंत परदेशी, पोलिस सहआयुक्त संजय शिंदे, एसआरपी पोलिस महानिरीक्षक अशोक मोराळे, पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक अंकीत गोयल, राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस अधीक्षक पंकज देशमुख आदी उपस्थित होते.

लडाख येथे २१ ऑक्टोबर १९५९ या दिवशी हॉटस्प्रिंग या कडाक्याच्या थंडीच्या ठिकाणी चिनी सैन्याने केंद्रीय निमलष्करी पोलिस दलाच्या १० शूर शिपायांच्या तुकडीवर पुर्वतयारीनिशी अचानक हल्ला केला. त्यावेळी त्या १० शूरवीरांनी शत्रूशी निकराने लढा देऊन देशासाठी बलिदान केले. तेव्हापासुन २१ ऑक्टोबर हा दिवस पोलिस दलाच्यावतीने पोलिस स्मृतीदिन म्हणून पाळला जातो.

गेल्या वर्षभरात महाराष्ट्रातील सहायक पोलिस निरीक्षक सुदर्शन भिकाजी दातीर, पोलिस हवालदार गौरव नथुजी खरवडे, जयंत विष्णुजी शेरेकर, विठ्ठल एकनाथ बढ़ने, पोलिस नाईक संजय रंगराव नेटके, अजय बाजीराव चौधरी असे एकूण सहा पोलिस जवान कर्तव्यावर असताना शहीद झाले. या वीर जवानांना आदरांजली वाहण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.