Ajit Pawar: 'पुणेकरांच्या सहनशीलतेला सलाम', मोदींच्या उपस्थितीत अजित पवारांचा मेट्रोकामाला टोला?

मोंदीच्या हस्ते आज पुणे मेट्रोचे उद्धाटन करण्यात येणार आहे
Ajit Pawar
Ajit PawarEsakal
Updated on

आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी पुणे दौऱ्यावर आहेत. मोंदीच्या हस्ते आज पुणे मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याचं उद्धाटन आज करण्यात येणार आहे. या कार्यक्रमावेळी 'पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुण्याच्या विकासाला साथ दिली, त्याचबरोबर महाराष्ट्राच्या विकासकामाला देखील साथ दिली आहे', असं अजित पवार म्हणाले आहेत.

यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले की, 'एंकदरीत पुणेकरांच्या सहनशीलतेला सलाम केला पाहिजे. कारण ही कामे करत असताना पुणेकरांना, पिंपरी, चिंचवडकरांना अनेक अडचणी येत असतात. पंरतु ती सहनशीलता त्यांनी दाखवली. आधी कोरोनाचा काळ होता. तरीदेखील कामामध्ये कोणताही विलंब होऊ नये यासाठी आम्ही कायमच प्रयत्न करतो असंही अजित पवार यावेळी म्हणाले आहेत.

Ajit Pawar
PM Modi Pune Visit: पंतप्रधानांची तिसरी पुणेवारी! या ३ कारणांमुळे मोदींचा दौरा ठरणार भाजपसाठी मास्टरस्ट्रोक

तर गेल्या वर्षी मेट्रोच्या पहिल्या टप्प्याच्या उद्धाटन कार्यक्रमाच्या प्रसंगी पुणेकरांच्या सहनशीलतेची दाद दिली पाहिजे, असा टोला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यावेळचे विरोधक आणि यावेळचे सहकारी असलेल्या भाजपला लगावला होता. तर गेल्या वर्षी महाविकास आघाडीचे सरकार होते आणि अजित पवार उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री होते.

Ajit Pawar
Opposition Leader: अखेर काँग्रेसचा विरोधी पक्षनेता ठरला! या नेत्याच्या गळ्यात पडली विरोधी पक्षनेत्याची माळ

गेल्या वर्षी काय म्हणाले होते अजित पवार?

'मी पंतप्रधान मोदी यांना सांगू इच्छितो की, 2006 ला भूमिपूजन आणि 2014 मध्ये मनमोहन सिंगाच्या हस्ते मुंबई मेट्रोचं उद्घाटन झालं. मात्र पुणेकरांना मेट्रोच्या कामामुळे खूप त्रास सहन करावा लागला आहे. हा प्रकल्प पुर्ण होण्यासाठी तब्बल १२ वर्ष लागले आहेत. यासाठी तुमच्या सहनशीलतेला सलाम करतो, असे उद्देशून ते पुणेकरांना म्हणाले आहेत. आणखी काही काळाकरिता तो सहन करावा लागणार आहे. मेट्रोच्या ठराव झाल्यानंतर बारा वर्षानंतर मेट्रो सुरु झाली आहे त्यामुळे मी पुणेकरांच्या सहनशीलतेला मी मानतो असं अजित पवार म्हणाले होते.

Ajit Pawar
Sushma Andhare Protest : सुषमा अंधारेंनी मणिपूरी विद्यार्थ्यांसोबत केलं आंदोलन; दिल्या 'नरेंद्र मोदी गो बॅक'च्या घोषणा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.