Sambhaji Bhide: ड्रेस घातलेल्या महिलांनी... अभिनेत्री अन् वटसावित्री पूजेबद्दल संभाजी भिडेंचे वादग्रस्त वक्तव्य

Bhide Guruji: भिडे यांनी हे वादग्रस्त विधान करण्यापूर्वीच पुणे पोलिसांनी त्यांना आषाढी एकादशीच्या वारीदरम्यान वादग्रस्त विधान करून वातावरण बिघडवू नये अशी नोटीस दिली होती.
Sambhaji Bhide
Sambhaji BhideEsakal
Updated on

सतत आपल्या विधानांमुळे चर्चेत येणारे संभाजी भिडे यांनी आता आणखी एक वादग्रस्त वक्तव्य केले आहे. त्यामुळे आता नवा वाद निर्माण शक्यता आहे.

पुणे येथे बोलताना संभाजी भिडे म्हणाले की, वटसावित्रीच्या पूजेला अभिनेत्री आणि ड्रेस घातलेल्या महिलांनी जाऊ नये. तेथे फक्त साडी घातलेल्या महिलांनीच जावे.

यावेळी बोलताना भीडे म्हणाले की, आपल्याला वारकरी-धारकरी संगम हा कार्यक्रम करायचा आहे. त्याचबरोबर गोमाता, भारतमाता, वेदमाता सारख्या 7 मतांच्या संरक्षणासाठी वाटेल ते करायला तयार असणे म्हणजे हिंदवी स्वराज्य व्रत होय. त्यामुळे वटसावित्रीच्या पूजेला अभिनेत्री आणि ड्रेस घातलेल्या महिलांनी जाऊ नये. तेथे फक्त साडी घातलेल्या महिलांनीच जावे."

Sambhaji Bhide
Traffic Update: ज्ञानोबा-तुकोबारायांच्या पालख्या आज दाखल होणार पुण्यनगरीत, वाहतुकीत मोठे बदल, या पर्यायी मार्गांचा करा वापर

पोलिसांच्या नोटिशीकडे दुर्लक्ष

दरम्यान भिडे यांनी हे वादग्रस्त विधान करण्यापूर्वीच पुणे पोलिसांनी त्यांना आषाढी एकादशीच्या वारीदरम्यान वादग्रस्त विधान करून वातावरण बिघडवू नये अशी नोटीस दिली होती. मात्र, भीडे यांनी पोलिसांच्या नोटिशीकडे दुर्लक्ष करत आता नवा वाद निर्माण केला आहे.

Sambhaji Bhide
Sambhaji Bhide: ड्रेस घातलेल्या महिलांनी... अभिनेत्री अन् वटसावित्री पूजेबद्दल संभाजी भिडेंचे वादग्रस्त वक्तव्य

गांधींबाबत वादग्रस्त विधान

संभाजी भीडेंनी गेल्या वर्षी अमरावतीमध्ये महात्मा गांधींबद्दलही वादग्रस्त विधान केले होत. त्यावेळी भीडे म्हणाले होते की, "महात्मा गांधींना मोहनदास करमचंद गांधी म्हणून ओळखले जाते, परंतु करमचंद गांधी हे मोहनदास यांचे वडील नव्हते, तर एक मुस्लिम जमीनदार त्यांचे खरे वडील होते." अमरावती येथील सभेत बोलताना भिडे यांनी महात्मा गांधींविरोधात पुरावे असल्याचा दावाही केला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.