पुणे - शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षासोबत आमची युती आहे, लोकसभा निवडणुकीमध्ये आम्ही त्यांचे प्रामाणिकपणे काम केले आहे. आगामी विधानसभा निवडणूक लढण्यास संभाजी ब्रिगेड तयार असून, उद्धव ठाकरे यांच्याकडे २५ जागांची मागणी केली आहे, असे संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष मनोज आखरे यांनी सांगितले.