घाबरण्याची नाही, डोक्याने लढण्याची गरज!

‘भित्यापाठी ब्रह्मराक्षस’ अशीच काहीशी गत कोरोनाच्या तिसऱ्या लाटेने केली आहे. कोरोना पॉझिटिव्ह होणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढतेय, त्यामुळे भीतीचे वातावरण आहे.
mask
masksakal
Updated on
Summary

‘भित्यापाठी ब्रह्मराक्षस’ अशीच काहीशी गत कोरोनाच्या तिसऱ्या लाटेने केली आहे. कोरोना पॉझिटिव्ह होणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढतेय, त्यामुळे भीतीचे वातावरण आहे.

‘भित्यापाठी ब्रह्मराक्षस’ अशीच काहीशी गत कोरोनाच्या तिसऱ्या लाटेने केली आहे. कोरोना पॉझिटिव्ह होणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढतेय, त्यामुळे भीतीचे वातावरण आहे; पण पॉझिटिव्ह झाल्यानंतर रुग्णालयात भरती करण्याची गरज पडणाऱ्यांची संख्या कमी आहे, त्यामुळे या लाटेचा सामना कसा करायचा, अशी संभ्रमावस्था सध्या दिसते. अनावश्यक भीती किंवा घाबरण्याचे कारण नसले तरी कोरोनाकडे दुर्लक्ष करूनही चालणार नाही. सर्व प्रकारची काळजी घेऊन दैनंदिन व्यवहार सुरळीत पार पडतील, अशीच जीवनशैली स्वीकारणे हेच याचे उत्तर राहील.

पुण्यात दुसऱ्या लाटेने अपरिमित हानी झाली. या लाटेच्या वेदना अद्यापही सुरू असताना तिसऱ्या लाटेच्या भोवऱ्यात आपण अडकलो आहोत. दुसऱ्या लाटेत पुण्यात रुग्णांची संख्या एवढ्या वेगाने वाढत नसली तरी रुग्णालयात दाखल कराव्या लागणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त असल्याने बेड मिळणे कठीण झाले होते. आताच्या लाटेत संसर्ग होणाऱ्यांची संख्या दर दोन दिवसांनी दुप्पट होत आहे; मात्र पॉझिटिव्ह होणाऱ्या रुग्णांपैकी ४.१५ टक्के रुग्णांनाच रुग्णालयात दाखल होण्याची गरज पडत आहे. त्यातही गंभीर रुग्णांचे तसेच ऑक्सिजन लागणाऱ्या रुग्णांचे प्रमाणही कमी आहे. त्यामुळे फारशी चिंता करण्याचे कारण नाही. मात्र ज्या पद्धतीने रुग्ण वाढत आहेत, तो वेग पाहता पुण्यात आखणी काळजी घेण्याची गरज आहे हे नक्की.

mask
पुणे : शहरात उन्हाळ्यात पाणीपुरवठ्यात कपात नाही

पुण्यात दररोज सरासरी वीस हजार चाचण्या होत आहेत. त्यात सुमारे पाच हजार पॉझिटिव्ह रुग्ण आढळत आहेत. गेल्या दहा पंधरा दिवसांत पुण्यातील एकूण रुग्णांची संख्या तीस हजारांच्या घरात गेली आहे. त्यात आणखी दहा ते पंधरा दिवस मोठी भर पडेल, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. त्यामुळे एक प्रकारच्या भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पण सर्वांनी योग्य पद्धतीने काळजी घेतली तर या लाटेलाही सहज परतवणे शक्य होणार आहे. सध्या वातावरणातील बदल कोरोनाला पोषक ठरत आहेत. सर्दी, खोकला, घसादुखी, ताप, अंगदुखी, संधीवात, कफ होणे यासारख्या विषाणूजन्य आजारांचे प्रमाण वाढले आहे. अशात कोरोना रुग्णांच्या थोडे जरी संपर्कात आलात तर कोरोनाची लागण होण्याची शक्यता जास्त आहे, त्यामुळे सामूहिक दक्षता घेणे हाच सर्वात चांगला उपाय आहे.

सध्याची लाट रोखण्यासाठी मास्कचा वापर, वारंवार हात धुणे, लक्षणे दिसताच तपासणी, संपर्कात आलेल्यांची चाचणी हेच उपाय सुचविले जात आहेत; पण त्याची गांभीर्याने अंमलबजावणी होताना दिसत नाही. ज्यांना यापूर्वी कोरोना होऊन गेला आहे, त्यांना पुन्हा लागण होण्याचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे अशा व्यक्तींनी अधिक काळजी घ्यायला हवी. चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतरही बाहेर फिरणाऱ्यांची संख्या जास्त आहे, अशा लोकांमुळे कोरोनाची साखळी तोडणे अवघड होत आहे.

त्यामुळे स्वतःच भान ठेवून सात दिवसांचे गृहविलगीकरण कसे पाळले जाईल, यावर भर द्यायला हवा. पॉझिटिव्ह झालेल्या रुग्णांवर लक्ष ठेवण्याची किंवा त्यांच्या संपर्कात येणाऱ्यांचा शोध घेण्याची व्यवस्था सध्यातरी दिसत नाही. त्यामुळे सात दिवसांच्या विलगीकरणात राहिलो तर स्वतःला, कुटुंबातील इतर व्यक्तींना आणि समाजाला होणारा धोका आपण टाळू शकते, एवढे भानही कोरोनाच्या या संकटातून बाहेर काढण्यास उपयुक्त ठरेल. आता कोणालाही लॉकडाउन किंवा आणखी निर्बंध नको आहेत. या परिस्थितीत आपल्याला व्यवहार सुरू ठेवण्याशिवाय पर्यायही नाही, मग अशा वेळी न घाबरता डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधे घेणे, विलगीकरणाचे नियम पाळणे आणि सात दिवसांनी पुन्हा नियमित कामाला बाहेर पडणे अशाच पद्धतीची जीवनशैली स्वीकारणे आवश्यक झाले आहे. सक्तीशिवाय आम्ही काहीच नियम पाळणार नाही, अशी बेफिकीरी कोणालाच परवडणार नाही. रस्त्यावर थुंकणाऱ्यांना, मास्क न वापरणाऱ्याला टोकायला हवे. शिस्त आणि नियम पाळण्याचा आग्रह हवा, तरच यातून सुटका होईल, अन्यथा चौथी, पाचवी अशा लाटा येतच राहतील.

mask
अमर मोहिते : पोलीस म्हणतात, कौटुंबिक अडचणींमुळे आलेल्या नैराश्यातून आत्महत्या!

हे नक्की करा

  • लक्षणे दिसताच स्वतःहून विलगीकरण करणे

  • न घाबरता योग्य औषधोपचार घेणे

  • आजार नीट समजून घेऊन उपचार करणे

  • मास्क आणि सार्वजनिक स्वच्छतेचे काटेकोर पालन

  • बूस्टर डोसची संख्या वाढवावी, निकष बदला

दृष्टिक्षेपात पुण्यातील कोरोना

  • ३० मार्च २०२१

  • चाचण्यांची संख्या : १९,५३७

  • पॉझिटिव्ह रुग्ण : ४,११९

  • गंभीर रुग्ण : १,३९१

  • एकूण रुग्णसंख्या : ४३,२४४

  • १५ जानेवारी २०२२

  • चाचण्यांची संख्या : १९,१७४

  • पॉझिटिव्ह रुग्ण : ५,७०५

  • गंभीर रुग्ण : २९०

  • एकूण रुग्णसंख्या : ३१,९०७

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.