Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi : माऊलींच्या प्रस्थान सोहळ्यासाठी वारकरी अलंकापुरीत दाखल

आस पंढरीची, ध्यास विठुरायाचा
Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi Sohala
Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi SohalaSakal
Updated on

आळंदी - चला हो पंढरी जाऊ, जिवाच्या जिवलगा पाहू, भिवरे स्नान करूनिया, संत पद धूळ शिरि लावू.

ही भावना उरी ठेवून हजारोंच्या संख्येने भाविक वारकरी राज्याच्या कानाकोपऱ्यातून आषाढी वारीसाठीच्या संत ज्ञानेश्वर माऊलींचे पालखी प्रस्थान वारीचा सोहळा अनुभवण्यासाठी आळंदीत दाखल होत आहेत. यंदा मृग नक्षत्रातील पाऊस समाधानकारक असल्याने मराठवाडा विदर्भातील वारकऱ्यांचा उत्साह अमाप दिसून येत आहे.

बहुसंख्येने या भागातील वारकरी दोन दिवसांपासून आळंदीत दाखल झाले आहेत. एकीकडे प्रशासनाची वारकऱ्यांना सोयीसुविधा पुरविण्याची लगबग तर दुसरीकडे धर्मशाळांमधून हरिनामाचा गजर सुरू झाल्याने आळंदीत वातावरण भक्तीमय झाले आहे.

संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे प्रस्थान शनिवारी (ता. २९) होत आहे. दुसऱ्या दिवशी रविवारी (ता. ३०) पालखी सोहळा आळंदीतून पंढरीच्या दिशेने पुण्याकडे मार्गस्थ होईल. दरम्यान परंपरेने चालत आलेली वारी माऊलींचरणी रुजू करण्यासाठी राज्यभरातून भाविक येवू लागले आहेत. खास करून विदर्भ मराठवाड्यातील भाविकांची उपस्थिती जादा जाणवत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.