सरला बेटाचे मठाधिपती रामगिरी महाराज हे सध्या चर्चेच आहेत. त्यांनी केलेल्या एका वादग्रस्त विधानाचे पडसाद सध्या राज्यभर उमटताना दिसत आहेत. या दरम्यान आज रामगिरी महाराजांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध म्हणून पुण्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन करण्यात आले. मात्र या आंदोलनावेळी जमलेल्या नागरिकांकडून 'सर तन से जुदा' तसेच टिपू सुलतान समर्थनार्थ घोषणाबाजी केल्याचा प्रकार समोर आला आहे. या घोषणाबाजीचा व्हिडीओ समोर आल्यानंतर पोलिसांकडून याप्रकरणी कारवाई करण्यात आली आहे.