कँटोन्मेंट - पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या सरदार पटेल रुग्णालयाच्या टेरेसवर एका व्यक्तीचा मृतदेह आढळल्याने, एकच खळबळ उडाली. टेरेसवर आढलेला मृतदेह रुग्णाचा होता की रुग्णाच्या नातेवाईकाचा होता की बाहेरची व्यक्ती होती, याबाबत अद्यापही काहीही माहिती उपलब्ध होऊ शकलेली नाही. घटनास्थळावर लष्कर पोलिस स्टेशनच्या पोलिसांनी भेट देऊन, त्या व्यक्तीचा मृतदेह पोलिसमार्टमसाठी ससून रुग्णालयात पाठविण्यात आला. मात्र, या घटनेमुळे पटेल रुग्णालयातील सुरक्षितताचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. याबाबत पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाकडून अद्यापही काहीही स्पष्टीकरण आलेले नाही.