मराठा समाजासाठी ‘सारथी’चे व्हीजन डॉक्युमेंट-२०३०

राज्यातील ‘मराठा, कुणबी, कुणबी-मराठा व मराठा-कुणबी’ या प्रवर्गाच्या सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक विकासासाठी सारथी संस्था १९ फेब्रुवारी २०१९ पासून कार्यरत आहे.
sarthi organization
sarthi organizationsakal
Updated on
Summary

राज्यातील ‘मराठा, कुणबी, कुणबी-मराठा व मराठा-कुणबी’ या प्रवर्गाच्या सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक विकासासाठी सारथी संस्था १९ फेब्रुवारी २०१९ पासून कार्यरत आहे.

पुणे - ‘मराठा, कुणबी, कुणबी-मराठा व मराठा-कुणबी’ समाजाच्या (Maratha Kunabi Society) सक्षमीकरणासाठी छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास (सारथी) संस्थेने (Sarthi Organisation) भविष्यकालीन योजनांचा आराखडा- २०३० (व्हीजन डॉक्युमेंट) (Vision Document) तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. या कालावधीत कोणते उपक्रम प्राधान्याने राबवावेत, याबाबत येत्या ३१ मार्चपर्यंत सूचना लेखी स्वरुपात पाठवाव्यात, असे आवाहन ‘सारथी’च्या वतीने करण्यात आले आहे.

राज्यातील ‘मराठा, कुणबी, कुणबी-मराठा व मराठा-कुणबी’ या प्रवर्गाच्या सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक विकासासाठी सारथी संस्था १९ फेब्रुवारी २०१९ पासून कार्यरत आहे. ‘सारथी’च्या उद्दिष्टांची कालबद्ध पूर्तता होण्यासाठी ‘आराखडा-२०३०’ तयार करण्याचा उपक्रम ‘सारथी’ने हाती घेतला आहे. यात नावीन्यपूर्ण व कल्पक योजनांचा समावेश करण्यासाठी तज्ज्ञ व्यक्तींचा सहभाग घेतला जाणार आहे.

sarthi organization
पुणे महापालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षपदी हेमंत रासने यांची निवड

‘सारथी’ मार्फत सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक विकासासाठी पथदर्शी प्रकल्प हाती घेण्यात येत आहेत. एम. फील आणि पीएच.डी अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यांना संघ लोकसेवा आणि राज्यसेवा आयोग पूर्व परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना प्रशिक्षण शुल्क, विद्यावेतन, पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थ्यांना एकरकमी आर्थिक साहाय्य हे उपक्रम प्रभावीपणे राबविण्यात येत आहेत. लोकसेवा आयोगाच्या २०१९ च्या नागरी सेवा परीक्षेमध्ये सारथी संस्थेने अर्थसाहाय्य व मार्गदर्शन केलेल्या २२ विद्यार्थ्यांची अंतिम निवड झाली आहे, असे ‘सारथी’चे व्यवस्थापकीय संचालक अशोक काकडे यांनी सांगितले.

सूचना पाठविण्याचा पत्ता

छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी), बालचित्रवाणी इमारत, पुणे.

sarthipune@gmail.com

संकेतस्थळ https://sarthi-maharashtragov.in

सर्वांच्या सूचना आणि सहभागामुळे ‘सारथी’ संस्थेचा प्रस्तावित भविष्यकालीन योजनांचा आराखडा- २०३० सर्वसमावेशक आणि व्यापक स्वरूपाचा होईल. मराठा, कुणबी, मराठा-कुणबी आणि कुणबी-मराठा समाजाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी हा आराखडा उपयुक्त ठरेल.

- अशोक काकडे, व्यवस्थापकीय संचालक, ‘सारथी’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.