Sassoon Hospital : 'आयसीयू'मध्ये उपचार घेणाऱ्या रुग्णाला चावले उंदीर; प्रकृती खालावल्याने पेशंटचा मृत्यू, ससून रुग्णालयातील घटना

पुण्याच्या भोर तालुक्यातील सागर रेणुसे या ३० वर्षीय तरुणाचा अपघात झाला होता. त्यानंतर या अपघातग्रस्त तरुणाला पुणे शहरातील ससून रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेले होते. त्याच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरु होते. १६ मार्च रोजी ससूनमध्ये दाखल केलेल्या रुग्णाचा मृत्यू झाला आहे.
pune mother bagging for baby medicine Sassoon Hospital
pune mother bagging for baby medicine Sassoon Hospitalsakal
Updated on

Pune News : पुण्यातील ससून रुग्णालय कायम या-ना त्या कारणाने चर्चेत असते. आता तर चक्क आयसीयूमधील रुग्णाला उंदीर चावल्याने त्याची प्रकृती बिघडल्याची घटना घडली आहे. १६ मार्च रोजी आयतीयूत दाखल झालेल्या रुग्णाचा २६ मार्च रोजी उंदराने चावा घेतला. त्यानंतर त्याचा मृत्यू झाला आहे.

पुण्याच्या भोर तालुक्यातील सागर रेणुसे या ३० वर्षीय तरुणाचा अपघात झाला होता. त्यानंतर या अपघातग्रस्त तरुणाला पुणे शहरातील ससून रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेले होते. त्याच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरु होते. १६ मार्च रोजी ससूनमध्ये दाखल केलेल्या रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

pune mother bagging for baby medicine Sassoon Hospital
Lok Sabha Election: तिकीट कापलं, भाजपचा विद्यमान खासदार ठाकरेंकडून लढणार? जळगावातलं समीकरण बदलणार?

ICU मध्ये उपचार घेणाऱ्या या रुग्णाचा २६ मार्च रोजी उंदराने चावा घेतला. डोके, कान आणि इतर अवयवाना चावा घेतल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे डॉक्टरांनी त्याला उंदीर चावल्याचं मान्य केलं. त्यानंतर रुग्णाची प्रकृती खालावली. अखेर रुग्णाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. 'एबीपी माझा'ने हे वृत्त दिले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()