Saswad News : सासवड येथील मानाचे आचार्य अत्रे साहित्यिक, पत्रकार व कलाकार पुरस्कार जाहीर

सासवड येथील पत्रकार व साहित्यसम्राट आचार्य प्र. के. अत्रे यांच्या नावाने दिले जाणारे जन्मगाव सासवड (ता. पुरंदर) येथील मानाचे आचार्य अत्रे साहित्यिक, पत्रकार व कलाकार पुरस्कार आज येथे जाहीर झाले.
vittal wagh, madhukar bhave and shridhar fadake
vittal wagh, madhukar bhave and shridhar fadakesakal
Updated on

सासवड - येथील पत्रकार व साहित्यसम्राट आचार्य प्र. के. अत्रे यांच्या नावाने दिले जाणारे जन्मगाव सासवड (ता. पुरंदर) येथील मानाचे आचार्य अत्रे साहित्यिक, पत्रकार व कलाकार पुरस्कार आज येथे जाहीर झाले. यामध्ये साहित्यिक पुरस्कार कवी व लेखक डाॅ. विठ्ठल वाघ यांना, पत्रकार पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे यांना आणि कलाकार पुरस्कार गीत संगीत क्षेत्रातील श्रीधर फडके यांना जाहीर झाला आहे.

पुरंदरमधील आचार्य अत्रे विकास प्रतिष्ठान व महाराष्ट्र साहित्य परीषद शाखा सासवड यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी आचार्य प्र. के. अत्रे यांच्या १३ जून या स्मृतिदिनी `आचार्य अत्रे पुरस्कार` सोहळा कार्यक्रम घेत असते. यंदा संयुक्त विद्यमाने अत्रेंचा ५४ वा स्मृतिदिन साजरा करीत आहे. या दिवशी ता. 13 जून रोजी सकाळी 10 वाजता सासवडच्या आचार्य अत्रे सांस्कृतिक भवनात हे पुरस्कार माजी केंद्रीय मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या हस्ते दिले जाणार आहेत., असे प्रतिष्ठानचे अध्यक्ष विजय कोलते यांनी सांगितले.

vittal wagh, madhukar bhave and shridhar fadake
Pune News : मद्यपींवर आता राहणार पोलिसांची करडी नजर

या पुरस्काराचे हे ३३ वे वर्ष आहे. या पुरस्कार वितरण कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून आमदार संजय जगताप उपस्थित राहणार आहेत. प्रमुख पाहुणे म्हणून खासदार सुप्रिया सुळे, विठ्ठलशेठ मणियार, अत्रेंचे नातू अॅड. राजेंद्र पै उपस्थित राहणार आहेत. यावेळी पत्रकार परीषदेस विजय कोलते यांच्यासह म.सा.प. सासवड शाखेचे अध्यक्ष अॅड. प्रकाश खाडे, प्रतिष्ठानचे सचिव शांताराम पोमण, बंडूकाका जगताप, खाजाभाई बागवान, ॲ. दिलीप निरगुडे, डॉ.राजेश दळवी, शशिकला कोलते, ॲड. कला फडतरे आदी मान्यवर उपस्थित होते.

आचार्य अत्रे साहित्य पुरस्कार मराठी साहित्यातील ज्येष्ठ कवी व लेखक डाॅ. विठ्ठल वाघ यांना जाहीर झाला आहे. वाघ यांचा आकोला जिल्ह्यात १९४५ साली जन्म झाला. त्यांनी काव्ययात्रेतून समाजप्रबोधन केले. त्यांनी पटकथा लेखन, अनेक चित्रपट गीते लिहलेली आहेत. काळ्या मातीत मातीत.. हा त्यांचा काव्यसंग्रह, संत गाडगेबाबा यांच्या जीवनावर डेबू ही कादंबरी लिहलेली आहे. यापुर्वी त्यांना अरे संसार संसार या चित्रपटातील गीतलेखनासाठी व देवकीनंदन गोपाला या चित्रपटाच्या गीत-पटकथा-संवादलेखनाबद्दल पुरस्कार मिळाले आहेत.

vittal wagh, madhukar bhave and shridhar fadake
ST Accidents : एसटीचा प्रवास ठरतोय जिवघेणा; वर्षभरात ३०१४ झाले अपघात

आचार्य अत्रे पत्रकारिता पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे यांना जाहीर झाला आहे. आचार्य अत्रे यांच्या मराठा दैनिकामध्ये १९५९ ते १९६९ या १० वर्षाच्या कालावधीत उपसंपादक व मुख्य वृत्तसंपादक म्हणून अत्रे यांच्याबरोबर काम केलेले आहे. लोकमत या दैनिकामध्ये ते ३४ वर्षे होते. त्यापैकी १५ वर्षे संपादक म्हणून काम केलेले आहे. भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू पासून डॉ.मनमोहन सिंग या सर्वांच्या मुलाखती घेण्याची संधी त्यांना मिळालेली आहे. सुमारे ३५ ग्रंथ व ८,००० लेख त्यांनी लिहलेले आहेत.

आचार्य अत्रे कलाकार पुरस्कार ज्येष्ठ गायक व संगितकार श्रीधर फडके यांना जाहीर झाला आहे. त्यांचा जन्म १९४९ साली मुंबई येथे झाला. महाराष्ट्रातील ज्येष्ठ गायक म्हणून त्यांची ख्याती आहे. विख्यात गायक संगीतकार सुधीर फडके यांचे ते पुत्र आहेत. त्यांनी अनेक मराठी व हिंदी चित्रपटांना संगीत दिलेले आहे. ऋतू हिरवा यासारखी भावगीतांचा कार्यक्रम त्यांनी संगीतबद्ध केलेला आहे. त्यांना १९९४ साली फिल्मफेअर पुरस्कार वारसा लक्ष्मीचा या चित्रपटासाठी संगीत दिल्याबद्दल मिळालेला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.