Crime News : अतिक्रमण कारवाईवेळी पालिका मुख्याधिकारी मोरे यांना दिली धमकी

सासवड येथील नगरपालिका हद्दीतील सार्वजनिक रस्ते, चौक, विनापरवाना टपऱया, वाहतुकीस अडथळा आणणारे शेड, ओटे, पायऱ्या, गटारे, नाले यावरील अतिक्रमणे काढण्यास सुरवात केली.
Saswad Nagarparishad
Saswad NagarparishadSakal
Updated on

सासवड, जि. पुणे - येथील नगरपालिका हद्दीतील सार्वजनिक रस्ते, चौक, विनापरवाना टपऱया, वाहतुकीस अडथळा आणणारे शेड, ओटे, पायऱ्या, गटारे, नाले यावरील अतिक्रमणे काढण्यास सासवड नगरपालिकेने काल (ता. 11) पासून सुरवात केली. मात्र आज (ता.12) सासवड शहरातील अंबोडी मार्गावरील पुरंदर हायस्कूल समोरील एका लोकवस्तीलगत अतिक्रमण काढत असताना एक माजी नगरसेवक सचिन भोंडे याने पालिकेचे मुख्याधिकारी निखिल मोरे यांना धमकी देण्याचा प्रकार घडला. त्यामुळे त्यांनी सासवड पोलीस ठाण्यात जाऊन समक्ष फिर्याद दाखल केली आहे.

मुख्याधिकारी निखिल मोरे यांनी आज सायंकाळी उशिरा पत्रकार परिषद नगरपालिकेमध्ये बोलविली होती. यामध्ये माहिती देताना सांगितले की., अतिक्रमण काढण्यासाठी किंवा काढण्यासंदर्भात नोटीसा दिल्यापासून जवळपास 60 ते 70 टक्के लोकांनी स्वतःहून अतिक्रमणे काढली. सुजाण लोक याला प्रतिसाद देत आहेत. मात्र आंबोडी रस्त्यावरील पुरंदर हायस्कूल समोरील भागात एक गृहनिर्माण सोसायटीच्या नावाखाली कमर्शियल बांधकाम करणाऱ्यांना एक महिन्यापूर्वी नगरपालिकेने नोटीस दिली होती. तरी तेथील पूर्ण अतिक्रमण न निघाल्याने ते काढण्याचा प्रयत्न आज नगरपालिकेने आपल्या यंत्रणेद्वारे केला. त्यावेळी तेथील वस्तीतील काही लोकांनी अगोदर विरोध केला.

परंतु विषय समजून सांगितल्यानंतर त्यांचा राग शांत झाला. मात्र सचिन भोंडे यांनी मी या संबंधित गृहनिर्माण सोसायटीचा अध्यक्ष आहे., असे सांगत. त्याने मला व नगरपालिकेच्या यंत्रणेला तुम्ही आज पोलीस बरोबर आहेत त्यामुळे दबाव आणून अतिक्रमणाच्या नावाखाली आमची बांधकामे तोडता. परंतु दोन दिवसानंतर तुमच्याबरोबर पोलीस नसतील. त्यावेळेस तुम्ही गावातही फिरू शकणार नाही किंवा फिरून देणार नाही., अशा प्रकारची थेट धमकी दिली. आणि कामात अडथळा आणला. याबाबत आपण आज दुपारी दोन ते तीनच्या दरम्यान घटना घडल्यानंतर सासवड पोलीस ठाण्यात जाऊन फिर्याद दाखल केली. ही फिर्याद नंतर अदखलपात्र गुन्हा म्हणून नोंदवण्यात आली. मात्र येत्या 24 तासात संबंधित सचिन भोंडे याने पोलिसांकडे आणि नगरपालिकेकडे माफीनामा लिहून न दिल्यास भादवि कलम 353 प्रमाणे सरकारी कामात अडथळा आणला आणि जिवे मारण्याची धमकी दिली.. या पद्धतीचा विस्तारित गुन्हा नोंदवला जाईल., हे आज मी स्पष्ट करतो.

खरे तर काल (ता. 11) सासवड शहरातील अतिक्रमणविरोधी पहिला दणका दिला पहीला दणका दिला. तो जेजुरी नाका, शहरातील जेजुरी मार्ग, पारगाव मार्ग, बाबू लोहार आदी परीसरात. तेथील 50 त 60 टक्के लोकांनी स्वतःहून अतिक्रमणे काढली. त्यामुळे तीस ते चाळीस टक्के अतिक्रमणे नगरपालिका अतिक्रमण विरोधी पथकाला काढावी लागली. त्यावेळेस कुठेही कोणी विरोध केला नाही.. वाद झाला नाही. आज मात्र वादाचा पहिला प्रसंग पुढे आला. या धमकी प्रकरणानंतरही येथून पुढे तीन ते चार दिवस ही अतिक्रमने काढण्याची कारवाई सुरु राहील, असे नगरपालिकेने आज पुन्हा जाहीर केले आहे. पत्रकार परिषदेत मुख्याधिकारी निखिल मोरे यांच्या समवेत नगरपालिकेचे नगररचनाकार सुमित काशिद, आरोग्य प्रमुख मोहन चव्हाण, अभियंता धोंडीराम भगनुरे, रामानंद कळसकर, कार्यालयीन अधीक्षक संदेश मांगडे, कर निरीक्षक उत्तम सुतार आदी मान्यवर उपस्थित होते.

'अतिक्रमने काढण्याची घाई न करता नगरपालिकेने अगोदर नोटीस देऊन सर्वांना ती स्वतःहून काढून घेण्यासाठी संधी दिली होती. त्यामुळे नुकसान टाळण्याचा प्रयत्न केला. आता शहरात विद्रुपीकरण करणारे कोणतेही अतिक्रमन ठेवणार नाही. शंभरहून अगोदरच नोटीसा बजावल्या. जिथे वाहतुकीस किंवा सार्वजनिक जागेत अतिक्रमने आहेत. तिथेही नोटीस न देता फुटपाथवरील, पुढे आलेले शेड, ओटे, बोर्ड, होर्डींग, शेड हे तर बिगरनोटीसद्वारेही पालिका काढणार आहे. त्यामुळे संबंधीतांनी अजूनही शहाणे व्हावे. नुकसान टाळावे. कोणाच्या आणि कुठल्याही दबावाला नगरपालिका यंत्रणा बळी पडणार नाही हे सर्वांनी लक्षात घ्यावे.'

- निखील मोरे, मुख्याधिकारी, सासवड नगरपालिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.