पुणे : जिल्ह्यात शनिवारी आणि रविवारी या लॉकडाऊनच्या कालावधीत दूध विक्री, हॉटेल, रेस्टॉरंटमधून घरपोच पार्सल सेवा, मेडिकल सुविधा, घरकाम करणाऱ्या महिला आणि परीक्षेसाठी पुण्यात आलेल्या विद्यार्थ्यांना खानावळीपर्यंत ये-जा करण्याची मुभा राहील. या व्यतिरिक्त कोणतीही दुकाने सुरू राहणार नाहीत, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली. शनिवारी आणि रविवारी होणाऱ्या लॉकडाऊनच्या नियोजना संदर्भात विभागीय आयुक्त कार्यालयात सौरभ राव यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. या बैठकीस महापालिका आयुक्त विक्रम कुमार, पिंपरी-चिंचवडचे महापालिका आयुक्त राजेश पाटील, पोलिसस आयुक्त अमिताभ गुप्ता, पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश, अन्न व औषधी प्रशासन आणि आरोग्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
- जगभरातील आणखी बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
जिल्ह्यात शनिवारी (ता. 10) आणि रविवारी (ता.11) या दोन दिवसांत कडक लॉकडाऊन होणार आहे. या कालावधीत केवळ काही अपवाद म्हणून काही सुविधांना वगळण्यात येणार आहे. त्यामध्ये दूध विक्री सकाळी सहा ते अकरापर्यंत सुरू राहील. नागरिकांना स्वतः सकाळी जाऊन दूध घेता येईल. औषधी दुकाने त्यांच्या वेळेनुसार दिवसभर सुरू राहतील. चष्म्याच्या दुकानांचा अत्यावश्यक सेवेत समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे चष्म्याची दुकानेही वैद्यकीय सेवेप्रमाणे सुरू राहतील. हॉटेल, रेस्टॉरंटमधून स्विगी झोमॅटो सारख्या पार्सल घरपोच सेवा सुरू राहतील. मात्र नागरिकांना स्वतः हॉटेलमध्ये जाऊन पार्सल घेता येणार नाही. परीक्षेसाठी बाहेर गावावरून पुण्यात आलेल्या विद्यार्थ्यांना खानावळीपर्यंत प्रवास करण्यास अडचण येणार नाही. तसेच, लसीकरणासाठी रुग्णालयात किंवा लसीकरण केंद्रात जाणाऱ्या नागरिकांना सवलत देण्यात आली आहे. याबाबत पोलिसांनाही सूचना देण्यात आले आहेत, असे विभागीय आयुक्त राव यांनी सांगितले.
- पुणे शहर आणि जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
घरकाम करणाऱ्या महिला, स्वयंपाकींना सवलत :
घरकाम करणा-या महिला, कामगार, वाहनचालक, स्वयंपाकी, ज्येष्ठ नागरिकांची व आजारी व्यक्तींची सेवा करणारे वैद्यकीय मदतनीस आणि नर्स यांना आठवड्यातील सर्व दिवस सकाळी सात ते रात्री दहा वाजेपर्यंत ये-जा करण्यास मुभा राहील, अशी माहिती विभागीय आयुक्त राव यांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.