रूपी बॅंक वाचवा, केंद्रीय अर्थमंत्री सीतारामन यांना कर्मचाऱ्यांचे साकडे

सीतारामन गुरुवारी बावधन येथील सूर्यदत्त कॉलेजमध्ये एका कार्यक्रमानिमित्त येणार होत्या. त्यामुळे त्यांना निवेदन देण्यासाठी रुपी बँकेचे कर्मचारी जमा झाले होते.
Nirmala Sitharaman
Nirmala SitharamanSakal
Updated on
Summary

सीतारामन गुरुवारी बावधन येथील सूर्यदत्त कॉलेजमध्ये एका कार्यक्रमानिमित्त येणार होत्या. त्यामुळे त्यांना निवेदन देण्यासाठी रुपी बँकेचे कर्मचारी जमा झाले होते.

पुणे - केंद्र सरकारने रुपी सहकारी बॅंक वाचविण्यासाठी प्रयत्न करावेत. तसेच कर्मचाऱ्यांना न्याय द्यावा, असे बॅंकेच्या ठेवीदार आणि कर्मचाऱ्यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना साकडे घातले.

सीतारामन गुरुवारी बावधन येथील सूर्यदत्त कॉलेजमध्ये एका कार्यक्रमानिमित्त येणार होत्या. त्यामुळे त्यांना निवेदन देण्यासाठी रुपी बँकेचे कर्मचारी जमा झाले होते. माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, माजी मंत्री बाळा भेगडे,आमदार भीमराव तापकीर यांनी कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. आम्ही सीतारामन यांचे लक्ष वेधण्यासाठी उभे आहोत. फक्त निवेदन देणार आहोत, असे त्यांनी सांगितले. रुपी बॅंकेच्या कर्मचाऱ्यांनी कोणतीही पगारवाढ न घेता निष्ठेने सेवा केली. परंतु बॅंकेचा कर्मचारी वर्ग दुर्लक्षित राहिला असून, त्यांना न्याय द्यावा, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. त्यावर सीतारामन यांनी निवेदन स्वीकारत मागणीबाबत विचार करण्याचे आश्वासन दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.