Pune News: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परीक्षा विभागातर्फे एमबीए प्रथम वर्ष प्रथम सत्रातील लीगल आस्पेक्ट ऑफ बिझनेस’ विषयाची परीक्षा शुक्रवारी होती. मात्र, या परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
त्यामुळे विद्यापीठाने ही परीक्षा रद्द करण्याचा निर्णय जाहीर केला. आता हा पेपर येत्या २६ डिसेंबर रोजी सकाळी १० ते दुपारी १२.३० या वेळेत घेतला जाणार आहे.
विद्यापीठाच्या परीक्षा विभागातर्फे पुणे, नगर आणि नाशिक या तीन जिल्ह्यांमध्ये संलग्न महाविद्यालयातील जवळपास साडे सात लाखांहून अधिक विद्यार्थ्यांची परीक्षा घेतली जाते. ऑक्टोबर २०२३ या सत्राची परीक्षा २१ नोव्हेंबरपासून सुरळीतपणे सुरू झाली.
त्यात एमबीए अभ्यासक्रमाची परीक्षा ११ डिसेंबरपासून सुरू झाली आहे. २२ डिसेंबर रोजी एमबीए २०१९ रिवाईज प्रथम सत्रातील लीगल आस्पेक्ट ऑफ बिझनेस’ विषयाची परीक्षा शुक्रवारी सकाळी अकरा वाजता सुरू होणार होती.
परंतु परीक्षा सुरू होण्यापूर्वीच या विषयाची प्रश्नपत्रिका सोशल मिडियावर व्हायरल झाल्याचे आढळून आले. त्यामुळे विद्यापीठाने ही परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.परीक्षेचे संवेदनशीलता गोपनीयता आणि पावित्र्य लक्षात घेता विद्यापीठाने पेपर रद्द करण्याचा निर्णय घेतला.
शुक्रवारी पेपर फुटीची घटना समोर आल्यामुळे हा पेपर रद्द करण्यात आला, आता हा पेपर येत्या २६ डिसेंबर रोजी सकाळी १० ते दुपारी १२.३० या वेळेत घेतला जाणार आहे, असे विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. महेश काकडे यांनी प्रकटनाद्वारे कळविले आहे.
विद्यापीठ प्रशासनातर्फे घेतल्या जाणाऱ्या लीगल आस्पेक्ट ऑफ बिझनेस या विषयाची प्रश्नपत्रिका परीक्षा सुरू होण्यापूर्वी सोशल मिडियावर फिरत असल्याचे आढळून आले. त्यामुळे विद्यापीठाने हा पेपर रद्द केला आहे. सर्व प्रकरणाची चौकशी केल्यानंतर दोषींवर नियमानुसार कारवाई केली जाणार आहे, असे विद्यापीठ प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.