पुणे : कोरोनाच्या पाश्वभूमीवर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाने प्रथम सत्राच्या परीक्षा शुल्क वाढीस स्थगिती आणली आहे. विद्यार्थ्यांकडून गतवर्षी प्रमाणे शुल्क घ्यावेत, असे आदेश महाविद्यालयांना देण्यात आले आहेत.
पुणे विद्यापीठाने शैक्षणिक वर्ष २०२०-२१ पासून शैक्षणिक शुल्कात वाढ केली होती. मात्र, कोरोनाच्या पाश्वभूमीवर या शुल्कवाढीवर स्थगिती आणली होती. परंतू, परीक्षा शुल्काबाबत कोणताही निर्णय घेण्यात आला नव्हता.
ऑगस्ट महिन्यापासून महाविद्यालयांनी ऑनलाईन शिक्षण सुरू केले आहे. पहिल्या सत्रातील बराचसा अभ्यासक्रम शिकवून पूर्ण झाला आहे. त्यावर जानेवारी महिन्यात पहिल्या सत्रांची परीक्षा होण्याची शक्यता आहे. परीक्षांबाबत विद्यापीठाने स्पष्टता आणलेली नसली तरी महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क जमा करण्याचे आदेश दिले आहेत. यामध्ये गेल्यावर्षी पेक्षा जास्त शुल्क घेतले जात असल्याचे समोर आल्याने विद्यार्थ्यांनी या शुल्कवाढीस विरोध केला होता. या शुल्कवाढीमध्ये प्रकल्प फीच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात वाढ केल्याचेही समोर आले आहे. याबाबतही खुलासा करण्याची मागणी केली होती.
एकीकडे करोना सारखे जागतिक महामारीचे संकट असताना दुसरीकडे ओला दुष्काळ, व कोरोना अशा दुहेरी संकटात पैशाची अडचण आहे. तसेच ऑनलाईन परीक्षा पद्धतीमध्ये खर्च कमी येत असताना, ऑफलाईन परीक्षा पेक्षा ऑनलाईन परीक्षा पद्धती मध्ये फि जास्त का? असा प्रश्न उपस्थित करण्यात आला होता.
पुणे विद्यापीठाच्या परीक्षा मंडळाची बैठक झाली. त्यामध्ये परीक्षा शुल्काच्या वाढीवर चर्चा करण्यात आली. कोरोनाच्या संकटामुळे विद्यार्थ्यांच्या पालकांपुढे आर्थिक अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थी हितासाठी २०२०च्या प्रथम सत्राच्या परीक्षांसाठी सर्व अभ्यासक्रमांच्या परीक्षा शुल्कात व अनुषंगिक शुल्कात वाढ करण्यात आलेली नाही, असा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे महाविद्यालयांनी गेल्यावर्षी प्रमाणे शुल्क आकारावे असे आदेश परीक्षा मंडळाचे डॉ. महेश काकडे यांनी दिले आहेत.
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
(Edited by: Ashish N. Kadam)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.