कडाक्‍याच्या थंडीतही आंदोलनाची धग कायम; पुणे विद्यापीठात विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरूच!

SPPU_Agitation
SPPU_Agitation
Updated on

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने घेतलेल्या परीक्षेच्या निकालात अजूनही त्रुटी असल्याने याविरोधात युवक क्रांती दलाच्या विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू केले आहे. दिवसभर या आंदोलनाची दखल न घेतल्याने रात्री उशिरापर्यंत या कडाक्‍याच्या थंडीत होते.

पुणे विद्यापीठाने अंतिम वर्षाच्या परीक्षा घेतल्या, त्यात मोठ्या प्रमाणात चुका झाल्याने हजारो तक्रारी परीक्षा विभागाकडे आल्या होत्या. विद्यापीठाने या तक्रारींची दखल घेऊन सुधारित निकाल जाहीर केला जाईल असे स्पष्ट केले, तरीही या सुधारित निकालात शून्य गुण, अनुपस्थित दाखविणे अशा त्रुटी असल्याचे समोर आले. याविरोधात 'युक्रांद'ने सात डिसेंबर रोजी आंदोलन केले होते. त्यानंतर 15 डिसेंबर पर्यंत पुन्हा एकदा सुधारित निकाल जाहीर केला जाईल असे स्पष्ट केले होते. सुमारे साडे सहा हजार विद्यार्थ्यांचा निकाल विद्यापीठाने लावला आहे. तरीही अद्याप काही त्रुटी आहेत.

विद्यार्थ्यांच्या पूर्ण अडचणी सोडविल्या गेल्या नसल्याने "युक्रांद'ने बुधवार सकाळपासून आंदोलन सुरू केले, परंतु विद्यापीठाने त्यांची दखल घेतली नसल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला असून, रात्री उशिराही कडाक्‍याच्या थंडीत विद्यार्थी मुख्य इमारतीच्या जवळ बसून होते.

युक्रांदचे शहराध्यक्ष सचिन पांडुळे म्हणाले, "विद्यापीठाने अनेक विद्यार्थ्याचे सुधारित निकाल जाहीर केले पण अजून सुमारे 200 विद्यार्थ्यांचे अडचणी कायम आहेत. यापूर्वी आंदोलन केले, पण आश्‍वासन देऊनही सर्वांना न्याय मिळत नसल्याने नाइलाजास्तव हा आंदोलन सुरूच ठेवणार आहोत.

परीक्षा संचालक डॉ. महेश काकडे म्हणाले, "विद्यापीठाने सुधारित निकाल जाहीर केले आहेत, आणखी कोणाच्या अडचणी असतील तर त्या तपासून निकाल लावण्यासाठी दोन अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. विद्यार्थ्यांशी संवाद सुरू आहे, त्यांनी त्यांच्या अडचणी सांगाव्यात.''

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.