तळेगाव ढमढेरे : तळेगाव ढमढेरे (ता.शिरूर) येथील कुमार जयसिंगराव ढमढेरे जिल्हा परिषद प्राथमिक मुलींची शाळा (ZP Primary Girls School) क्रमांक दोन मधील तनिष्का जयकुमार गायकवाड या मुलीने ३०० पैकी २९६ गुण (९८.६६ टक्के ) मिळवून, इयत्ता पाचवीच्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत राज्यात प्रथम क्रमांक मिळवला आहे अशी माहिती मुख्याध्यापक अशोक राऊत व मार्गदर्शक शिक्षिका सीमा गवारी यांनी दिली. (Pune Scholarship Exam Result Updates)
शिष्यवृत्ती परीक्षेत याच विद्यालयातील ९ विद्यार्थिनी राज्यस्तरीय गुणवत्ता यादीत चमकल्या आहेत, तर जिल्हा गुणवत्ता यादीत १२ मुलींनी बाजी मारली आहे. या शाळेतील मुलींनी शिष्यवृत्ती परीक्षेत मिळवलेल्या यशाचे विशेष कौतुक आमदार अशोक पवार, गटशिक्षणाधिकारी बाळकृष्ण कळमकर, शिक्षण विस्तार अधिकारी वंदना शिंदे, केंद्रप्रमुख रामदास विश्वास, सरपंच अंकिता भुजबळ, उपसरपंच नवनाथ ढमढेरे, शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष प्रियंका कुंभार व ग्रामस्थांनी केले आहे.
राज्यस्तरीय गुणवत्ता यादीत चमकलेल्या ९ मुली, त्यांचे गुण व क्रमांक :- तनिष्का जयकुमार गायकवाड ३०० पैकी २९६ गुण (राज्यात प्रथम), निर्मयी संदीप गोसावी (२९२, दुसरी), कृष्णाली अजित गडाख (२९०, तिसरी, ), वेदिका गोरक्षनाथ दरवडे व श्रेया बापू वडघुले( २८२, सातवी), तन्वी संदीप भुजबळ (२८०, आठवी), तृप्ती गणेश चौधरी (२७८, नववी), पूर्वा संदीप भुजबळ व सई सुधीर ढमढेरे (२७६, दहावी).
जिल्हा गुणवत्ता यादीत चमकलेल्या १२ मुली व त्यांचे गुण :-
कार्तिकी प्रमोद खामकर(२७०), कोमल दत्तात्रय डोकेे (२६८), नंदजा लक्ष्मण निम्मनवाड(२६०), प्रणाली जितेंद्र जेधे (२५४), प्रणिती दुर्योधन कांबळे व श्रावणी योगेश कुंभार(२५०), गौरी प्रवीण ढमढेरे (२४८), सिद्धी संदीप राऊत(२४०), कार्तिकी महादेव भुजबळ (२३४), ऋचिका रमेश नरके (२३२), आदिती रमेश नरके (२२८) व अक्षरा शैलेश गायकवाड(२२६).
तळेगाव ढमढेरे येथील तनिष्का गायकवाड हिने शिष्यवृत्ती परीक्षेत राज्यात प्रथम क्रमांक व याच शाळेतील ९ मुलींनी या परीक्षेत बाजी मारून, तालुक्याचे नाव पुन्हा शैक्षणिक क्षेत्रात राज्याच्या नकाशावर नेले आहे. सर्व यशस्वी मुली व मार्गदर्शक शिक्षकांचे विशेष अभिनंदन. तालुक्यातील विविध शाळांतील मुले व मुली शिष्यवृत्ती परीक्षेत चमकले आहेत, तालुक्यातील शिक्षण क्षेत्र आघाडीवर असून, शाळांना मूलभूत सुविधा मिळवून देण्यासाठी कटिबद्ध असल्याचे आमदार अशोक पवार यांनी शिष्यवृत्ती परीक्षेतील निकलाबाबत प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.