पुणे - शालेय विद्यार्थी वाहतूक हा संवेदनशील विषय असून, विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून शाळा आणि विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या बसचालकांनी स्कूल बस नियमावलीचे काटेकोर पालन करावे, असे निर्देश पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी दिले.
पोलिस आयुक्तालयात आयोजित शालेय विद्यार्थी वाहतूक जिल्हा सुरक्षितता समितीच्या बैठकीत बोलत होते. पोलिस सहआयुक्त संदीप कर्णिक, वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त विजयकुमार मगर, प्रादेशिक परिवहन अधिकारी अजित शिंदे, पुणे ग्रामीणचे अतिरिक्त पोलिस अधीक्षक डॉ. मितेश घट्टे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजीव भोर, अतुल आदे आदी या वेळी उपस्थित होते.
रितेश कुमार म्हणाले, विद्यार्थ्यांची घर ते शाळेदरम्यानच्या वाहतुकीदरम्यान अपघात किंवा जीवितास धोक्याच्या घटनांना प्रतिबंध होण्यासाठी स्कूल बस नियमावलींचे काटेकोर पालन करणे आवश्यक आहे. स्कूल बसमध्ये मदतनीस, मुलींची वाहतूक होणाऱ्या स्कूल बसमध्ये महिला मदतनीस बंधनकारक आहे. या बसेसचे वाहनचालक चांगले प्रशिक्षित, नैतिकदृष्ट्या सक्षम, पूर्वेतिहास चांगला असावा. या बाबींची खात्री शालेय परिवहन समितीने करावी.
वाहनांच्या तपासणीसाठी विशेष मोहीम
शहरात माहिती तंत्रज्ञान कंपन्यांसह रात्रपाळीत काम करणाऱ्या महिलांसह प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी ऑटोरिक्षा, टॅक्सीच्या तपासणीसाठी पोलिस विभाग, वाहतूक शाखा आणि परिवहन विभागाने संयुक्त विशेष मोहीम हाती घ्यावी.
रात्री अडवून जादा प्रवासभाडे मागणे, चोऱ्या, प्रवाशांना मारहाण घडल्याचे लक्षात घेऊन रात्री नाकाबंदीच्यावेळी सर्व वाहनांची कसून तपासणी करावी. नियमांचे उल्लंघन आढळलेल्या वाहनांवर, चालकांवर कठोर कारवाई करावी. फॅन्सी नंबरप्लेट असलेल्या वाहन चालकांवर नंबरप्लेट कठोर पावले उचलावीत, असे निर्देश पोलिस आयुक्तांनी दिले.
जिल्ह्यात स्कूल बस विद्यार्थी वाहतूक समितीचे संकेतस्थळ
https://schoolbussafetypune.org
जिल्ह्यातील स्कूल बस - ९ हजार ६६३
संकेतस्थळावर नोंदणीकृत शाळा- ५ हजार ७३१
परिवहन विभागाकडून वाहनांची तपासणी- ७०९ स्कूल बस आणि ४१७ इतर वाहने
दोषी आढळलेली वाहने - १७८ स्कूल बस आणि ८४ इतर वाहने
वसूल दंडाची रक्कम - २९ लाख ७५ हजार रुपये.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.