शालेय पोषण आहार होणार बंद?

विद्यार्थांना आहाराऐवजी मिळणार पैसे; आदेशाची प्रतिक्षा
School children food
School children foodfile image
Updated on

पुणे: विद्यार्थ्यांना शाळेच्या मधल्या सुटीत दुपारच्यावेळी मिळणारा शालेय पोषण आहार आता बंद होण्याची शक्यता आहे. राज्य सरकारने या आहाराच्या बदल्यात विद्यार्थ्यांना रोख रक्कम देण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. हे पैसे विद्यार्थ्यांच्या खात्यावर जमा करण्याचे नियोजन केले जात आहे. याबाबत जिल्हा शिक्षण विभागाला आदेश प्राप्त झालेला नाही. या वृत्ताला पुणे जिल्हा परिषदेचे उपसभापती व शिक्षण सभापती रणजित शिवतरे यांनी दुजोरा दिला आहे.(School children will get money instead of food Awaiting order)

राज्यातील शाळांमधील पहिली ते आठवीच्या वर्गातील सर्व विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार आणि माध्यान्ह भोजन योजनेंतर्गत दुपारच्या वेळी शाळांमध्ये शिजवलेला पोषण आहार दिला जातो. पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार तर, सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना माध्यान्ह भोजन योजनेंतर्गत हा पोषण आहार पुरवठा केला जातो.

मागीलवर्षी मार्च महिन्यात कोरोनाचा संसर्ग सुरू झाल्यापासून शाळा बंद आहेत. त्यामुळे गेल्या वर्षी पहिल्यांदा विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहाराचा पुरवठा कसा करायचा, असा प्रश्‍न निर्माण झाला होता. दरम्यान, या पोषण आहारासाठीचा आवश्‍यक कच्चा माल गोदामांमध्ये पडून होता. त्याला कीड लागण्यास सुरवात झाली होती. या पार्श्‍वभूमीवर सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या घरीच कच्चा आहार पुरवठा करण्यास परवानगी देण्याची मागणी पुणे जिल्हा परिषदेने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली होती. यानुसार राज्यातील सर्व विद्यार्थ्यांना गेल्या वर्षीपासून पोषण आहाराचा कच्चा माल घरपोच दिला जात होता. मे-२०१२ पर्यंत हा आहार पुरवठा करण्यात आला.

School children food
85 टक्के शुल्क पालक भरणार का? संस्थाचालक संघटनेचा सवाल

यंदाचे शैक्षणिक वर्ष सुरू होऊन महिनाभराचा काळ लोटला आहे. मे-२०२१ नंतर आतापर्यंत विद्यार्थ्यांना हा आहार मिळू शकला नाही. दरम्यान, आता शालेय पोषण आहाराच्या साहित्याऐवजी विद्यार्थ्यांना रोख रक्कम देण्याचे नियोजन सरकारकडून केले जात आहे. त्यानुसार पोषण आहाराची रक्कम थेट विद्यार्थ्यांच्या खात्यावर जमा करण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. तशी पूर्वकल्पना जिल्हा परिषदांना दिली आहे. परंतु, अद्याप याबाबत आदेश प्राप्त झालेला नाही.

राज्य सरकार चालू शैक्षणिक वर्षापासून शालेय पोषण आहाराऐवजी रोख रक्कम देण्याच्या विचारात आहे. तशी पूर्वकल्पना जिल्हा परिषदेला मिळाली आहे. परंतु, याबाबतचा आदेश आला नाही. चालू शैक्षणिक वर्षात पुणे जिल्ह्यातील शालेय विद्यार्थ्यांना अद्याप पोषण आहार पुरवठा झालेला नाही.

- रणजित शिवतरे

उपाध्यक्ष व शिक्षण सभापती जिल्हा परिषद, पुणे

School children food
समाविष्ट गावांसाठी पाणीपुरवठ्याची जबाबदारी पालिका घेणार का?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.