विश्रांतवाडी परिसरात विद्यार्थ्यांचे अनोख्या पद्धतीने स्वागत

कोरोना १९च्या प्रादुर्भावामुळे गेली दीड वर्षांपासून बंद असलेली शाळा सोमवारी सुरू झाली.
विश्रांतवाडी परिसरात विद्यार्थ्यांचे अनोख्या पद्धतीने स्वागत
sakal
Updated on

विश्रांतवाडी : कोरोना १९च्या प्रादुर्भावामुळे गेली दीड वर्षांपासून बंद असलेली शाळा सोमवारी सुरू झाली. विश्रांतवाडी परिसरात इयत्ता आठवीचे बारावीचे वर्ग सुरू होताना विद्यार्थी व शिक्षकांमध्ये सगळीकडे आनंदाचे वातावरण होते. महाराष्ट्र हाऊसिंग बोर्ड येरवडा येथील गेनबा सोपानराव मोझे प्रशालेच्या विद्यार्थ्यांचे ढोल-ताशांच्या गजरात पुष्पगुच्छ, पेन, पाठ्यपुस्तके देऊन आणि पेढे भरवून स्वागत करण्यात आले.

विश्रांतवाडी परिसरात विद्यार्थ्यांचे अनोख्या पद्धतीने स्वागत
लातूर : विजेचा शॉक लागून खाजगी लाईन मॅनचा मृत्यू

गेली दीड वर्षांपासून घरामध्ये बंदिस्त असणाऱ्या विद्यार्थ्यांनी आज आनंदाने शाळेत येऊन मोकळा श्वास घेतला. ऑनलाइन तासिकांना कंटाळलेले, घरात बंदिस्त, खेळायला मैदानात जायचे नाही, मित्र-मैत्रिणींसोबत वैचारिक देवाण-घेवाण बंद, मोबाईलच्या छोट्या स्क्रीनने वाढलेला डोळ्यांवरचा आणि मनावरचा ताण इ. कारणांमुळे कंटाळलेल्या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर शाळेत आल्यावर कमालीचा आनंद व उत्साह जाणवला. तोंडाला मास्क, हाताला सॅनिटायझर, सुरक्षित अंतर इ.आरोग्य सुरक्षिततेचे नियम पाळून विद्यार्थी नव्या जोमाने आज शाळेमध्ये हजर झाले. शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांची उपस्थिती उल्लेखनीय होती.

विश्रांतवाडी परिसरात विद्यार्थ्यांचे अनोख्या पद्धतीने स्वागत
सातारा: दागिने पॉलिशच्या बहाण्याने चोरी करणाऱ्या टोळीस अटक

शालेय समिती अध्यक्ष प्राध्यापिका अलका पाटील यांनी विद्यार्थ्यांचे स्वागत करून शुभेच्छा देताना "विद्यार्थ्यांनी गुलाबाप्रमाणे टवटवीत राहून आपणास दिलेल्या पेनचा स्वच्छ अक्षर आणि सुंदर लिखाणासाठी उपयोग करा" अशा शुभेच्छा दिल्या.

गेनबा सोपानराव मोझे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष रामभाऊ मोझे, उपाध्यक्ष ज्ञानेश्वर मोझे, संस्थेचे सदस्य संजय मोझे, वडगाव शेरी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष नानासाहेब नलावडे ,गेनबा सोपानराव मोझे प्रशालेचे प्राचार्य जालिंदर भागवत, उपमुख्याध्यापक लक्ष्मण यादव , उच्च माध्यमिक विभाग प्रमुख सतीश सूर्यवंशी इत्यादी मान्यवरांनी विद्यार्थ्यांचे स्वागत करून ज्ञानार्जन करण्यासाठी शुभेच्छा दिल्या. प्रशालेतील सर्व शिक्षकांनी स्वागत उत्सवाच्या कार्यक्रमाचे यशस्वी संयोजन व नियोजन केले. तसेच विश्रांतवाडी, कळस, धानोरी, प्रभाग क्रमांक 1 मधील शाळांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांचं औक्षण करून कॅडबरी चॉकलेट देऊन सर्व शाळांमध्ये नगरसेविका रेखा चंद्रकांत टिंगरे व चंद्रकांत टिंगरे यांनी विद्यार्थ्यांचे स्वागत केले

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.