Pune News : शाळकरी मुलगा तोल गेल्याने पुलावरून पडला पाण्यात

यशवंतराव चव्हाण पुलावरून एक शाळकरी मुलगा (वय १२) तोल गेल्याने पाण्यात पडला. ही घटना सोमवारी (ता. २९) सायंकाळी सव्वापाच वाजण्याच्या सुमारास घडली.
yashwantrao chavan bridge pune
yashwantrao chavan bridge punesakal
Updated on

पुणे - पूना हॉस्पिटल येथील यशवंतराव चव्हाण पुलावरून एक शाळकरी मुलगा (वय १२) तोल गेल्याने पाण्यात पडला. ही घटना सोमवारी (ता. २९) सायंकाळी सव्वापाच वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेनंतर अग्निशामक दलाच्या जवानांकडून शोधकार्य सुरू करण्यात आले आहे.

खडकवासला धरणातून मुठा नदीत मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे नदीपात्रातील पाणी बघण्यासाठी नागरिकांनी शहरातील पुलांवर गर्दी केली आहे. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, सदाशिव पेठेतील पूना हॉस्पिटलजवळ पुलावर तो बसला होता.

त्याचा अचानक तोल गेल्यामुळे तो दप्तरासह पाण्यात पडला. तेथील नागरिकांनी अग्निशामक दलाच्या नियंत्रण कक्षास माहिती दिली. अग्निशामक दलाकडून तातडीने दोन पथके रवाना करुन शोधकार्य सुरू केले आहे. या शाळकरी मुलाने निळ्या रंगाचा गणवेश परिधान केलेला होता.

नदीपात्रात सध्या पाण्याचा प्रवाह अधिक आहे. कसबा आणि येरवडा अग्निशामक केंद्राकडून टिळक पूल आणि बंडगार्डन पुलाजवळ जवानांकडून मुलाचा शोध घेण्यात येत आहे. तसेच, संगम घाटालगत रेस्क्यू व्हॅन तैनात करण्यात आल्याची माहिती अग्निशामक दलाच्या सूत्रांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.