Jeevangaurav Award : शास्त्रज्ञ डॉ. कुलकर्णी यांना जीवनगौरव पुरस्कार

राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेतील (एनसीएल) वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अमोल कुलकर्णी यांना इंडियन केमिकल कौन्सिलच्या वतीने डी. एम. त्रिवेदी जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
Dr. Amol Kulkarni
Dr. Amol Kulkarnisakal
Updated on

पुणे - राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेतील (एनसीएल) वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अमोल कुलकर्णी यांना इंडियन केमिकल कौन्सिलच्या वतीने डी. एम. त्रिवेदी जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. भारतीय रसायनशास्त्रातील शैक्षणिक आणि संशोधनात्मक कार्यासाठी हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.

एनसीएलमधील रसायन अभियांत्रिकी आणि प्रक्रिया विकास विभागात २००५ पासून डॉ. कुलकर्णी कार्यरत आहे. जर्मनीतील मॅक्स प्लॅंक इन्स्टिट्यूटमध्ये हमबोल्ड्ट फेलो म्हणून पोस्ट डॉक्टरल रिसर्च त्यांनी केला आहे. तसेच अमेरिकेतील एमआयटी विद्यापीठात रिसर्च फेलो म्हणून त्यांनी कार्य केले आहे.

डॉ. कुलकर्णी यांनी कंट्यूनिअस फ्लो रिअॅक्टर विकसित केला असून, त्यामुळे औषधनिर्माण, रंग आदी रसायन उद्योगांना फायदा झाला आहे. त्यांनी देशातील पहिली मायक्रो रिअॅक्टर प्रयोगशाळा त्यांनी स्थापित केली आहे. नॅशनल सायन्स ॲकॅडमीचे मानद सदस्य असलेले डॉ. कुलकर्णी यांना देशातील प्रतिष्ठेचा शांती स्वरूप भटनागर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. आजवर ११५ वरून अधिक शोधनिबंध आणि ३५ पेटंट त्यांच्या नावावर आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.