शिवाजीनगर - महाराष्ट्रात निवडणूकीचे वादळ घेंगावत असताना राजकीय नेते, पदाधिकारी काय भुमिका घेतील? याचा काही थांगपत्ता लागत नाही. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्य सरचिटणीस रणजीत शिरोळे यांनी आपल्या पदाचा व प्राथमिक सदस्याचा राजीनामा देत असल्याचे पत्रकार परिषद घेऊन घोषित केले.