Pune News: चांदणी चौक परिसरात कलम १४४ लागू; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

चांदणी चौकातील पूल आज मध्यरात्री पाडण्यात येणार आहे.
Pune Chandani Chowk Bridge Demolition Explosive filling work started
Pune Chandani Chowk Bridge Demolition Explosive filling work started sakal
Updated on

पुणे : प्रचंड वाहतूक कोंडीला कारणीभूत ठरणारा चांदणी चौकातील पूल आज मध्यरात्री पाडण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर चौक परिसरात १४४ कलम लागू करण्यात आलं आहे. त्यामुळं इथं लोकांनी गर्दी करता येणार नाही, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिली आहे. (Section 144 enforced in Chandni Chowk area by order of Pune Collector)

Pune Chandani Chowk Bridge Demolition Explosive filling work started
5G लाँच होताच CM शिंदेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, यामुळे एक...

पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं, "चांदणी चौक परिसरात कलम १४४ लागू होणार आहे. सगळ्या पूल पाडण्याची सर्व तयारी व्यवस्थित असेल, स्फोटकांचं कनेक्शन नीट असेल तर स्फोट वेळेआधीच केला जाईल. पहाटे १ ते २ वाजण्याच्या वेळेत पूल पाडण्यात येईल.

Pune Chandani Chowk Bridge Demolition Explosive filling work started
शिंदे गटाचे आमदार निवडून येणार नाहीत, आल्यास हिमालयात जाईन - चंद्रकांत खैरे

यासाठी दोन्ही मार्गावरील वाहतूक रात्री ८ नंतर थांबवण्याचे काम सुरू होईल. तत्पूर्वी संध्याकाळी ६ वाजल्यानंतर परिसर निर्मनुष्य करायला सुरुवात होईल. लवकरात लवकर हा पूल पाडून नागरिकांची गैरसोय होणार नाही असा प्रशासनाचा प्रयत्न आहे. यानंतर सकाळी लवकरात लवकर या रस्त्यावरील वाहतूक पूर्ववत केली जाईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.