पुणे : ‘‘विसाव्या वर्षी लग्नानंतर पुण्यात आले, तेव्हापासून नियमित मतदान करते आहे. यावेळीही माझं मतदान चुकलं नाही. माझं मतदान करून घेण्यासाठी एवढे जण आले, त्याचा खूप आनंद झाला. मला घरी मतदान करण्याचा अधिकार मिळाला हे सोईचे झाले,’’ अशी भावना ९९ वर्षांच्या मतदार विमल शिंगणे यांनी व्यक्त केली.