Pune Crime News : ज्येष्ठ महिलेच्या खून प्रकरणी तरुण दांपत्यास अटक

मांजरवाडी (ता. जुन्नर )येथील घनवट मळा शिवरातील सुलोचना कोंडीभाऊ टेमगिरे (वय ७०) या जेष्ठ शेतकरी महिलेचा निर्घृन खून शेतमजूर असलेल्या तरुण दाम्पत्याने चोरीच्या उद्देशाने केला असल्याचे पोलीस तापासात निष्पन्न झाले
senior farmer women murder case couple arrested at narayangaon crime police
senior farmer women murder case couple arrested at narayangaon crime policeSakal
Updated on

नारायणगाव : मांजरवाडी (ता. जुन्नर )येथील घनवट मळा शिवरातील सुलोचना कोंडीभाऊ टेमगिरे (वय ७०) या जेष्ठ शेतकरी महिलेचा निर्घृन खून शेतमजूर असलेल्या तरुण दाम्पत्याने चोरीच्या उद्देशाने केला असल्याचे पोलीस तापासात निष्पन्न झाले आहे.

या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखा विभाग व नारायणगाव पोलीस स्टेशन पथकाने संयुक्त कारवाई करून आरोपींना अटक केली आहे.अशी माहिती नारायणगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार यांनी दिली.

या याप्रकरणी शिवम उर्फ संकेत शाम श्रीमंत(वय 21) व त्याची पत्नी पूनम संकेत श्रीमंत (वय 20,दोघेही राहणार गजानन नगर, ता.चिखली जि. बुलढाणा) यांना आज अहमदनगर येथे अटक करण्यात आली आहे.

सुलोचना टेमगिरे (वय ७०) यांच्या पतीचे व एका मुलाचे कोरोनामुळे निधन झाले आहे. सध्या सुलोचना टेमगिरे या दुसऱ्या मुला समावेत घनवट मळा येथील शेतात रहात होत्या. त्यांचा मुलगा पुणे येथे नोकरीला आहे.

सायंकाळी तो घरी येत असे. आरोपी हे शेजारील शेतकऱ्याच्या येथे कामास होते. यामुळे आरोपी व सुलोचना टेमगिरे यांची ओळख होती. मुलगा नोकरी निमित्त बाहेर गेल्यास त्या दिवसभर एकट्याच घरी असतात. याची माहिती आरोपींना समजली होती.

यामुळे आरोपींनी सुलोचना टेमगिरे यांच्या घरी दिवसा चोरी करण्याचे नियोजन केले. आजोबा आजारी असल्याचे मालकाला सांगून आठ फेब्रुवारी रोजी आरोपी दांपत्य बुलढाणा येथे गावी गेले.

12 फेब्रुवारी रोजी ते सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास सुलोचना टेमगिरे यांच्या घरी आले. त्या एकट्या असल्याचे पाहून आरोपींनी त्यांच्याकडे पैशाची मागणी केली. पैसे देण्यास विरोध केल्याने आरोपींनी सुलोचना टेमगिरे यांचा गळा व हातावर वार करून खून केला.

घरातील दागिने घेऊन घरासमोर मोटरसायकल घेऊन ते पसार झाले. दरम्यान मोटरसायकल बंद पडल्याने जवळच्या शेतात मोटरसायकल उभी केली.याप्रकरणी नारायणगाव पोलीस ठाण्यामध्ये अज्ञात व्यक्तीच्या विरोधात 12 फेब्रुवारी रोजी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र चौधर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शीळीमकर व नारायणगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार यांनी घटनेचा तपास सुरू केला.

आरोपीचा शोध घेण्यासाठी पथके तयार करण्यात आली होती. घटनास्थळी सापडलेली आरोपी महिलेची ओढणी, सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल लोकेशन या आधारे पोलिसांनी आरोपींना आज अहमदनगर येथे अटक केली.

घटनेनंतर दोन दिवसातच गुन्ह्याची उकल करून आरोपींना अटक करण्यात यश आल्याने पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी आज दुपारी नारायणगाव पोलीस ठाण्यात भेट देऊन तपास पथकातील पोलीस अधिकारी व कर्मचारी यांचे अभिनंदन केले. पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार,

राहुल गावडे, फौजदार अभिजीत सावंत,सनील धनवे, जगदेव पाटील, विनोद धुर्वे, पोलीस अंमलदार दिपक साबळे, राजू मोमीण, अतुल डेरे, प्रकाश वाघमारे, विक्रम तापकीर, मंगेश थिगळे, अक्षय नवले, संदिप वारे, शैलेश वाघमारे,

तुषार भोईटे, संतोष कोकणे, अमोल शेडगे, धिरज जाधव, सत्यम केळकर, निलेश शिंदे, अक्षय सुपे, दगडू विरकर, सचिन सातपुते, आदिनाथ लोखंडे, गोविंद केंद्रे, मंगेश लोखंडे, दत्ता ढेंबरे, महिला अंमलदार तनश्री घोडे या या पथकाने आरोपींचा शोध घेऊन अटक केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.