Construction Field : बांधकामात ज्येष्ठांच्या गरजांना प्राधान्य; सर्वोत्तम सुविधा पुरविण्यावर भर

आपण सदनिकेची निवड करताना कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीच्या गरजांचा विचार करत असतो. त्यात लहान मुले आणि ज्येष्ठांना प्राधान्य देत असतो.
Senior Citizens
Senior CitizensSakal
Updated on

पुणे - आपण सदनिकेची निवड करताना कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीच्या गरजांचा विचार करत असतो. त्यात लहान मुले आणि ज्येष्ठांना प्राधान्य देत असतो. ज्येष्ठांच्या गरजा लक्षात घेऊन सध्या त्यांच्यासाठीचे स्वतंत्र गृहप्रकल्प निर्माण केले जात आहेत. निसर्गाच्या सान्निध्यात आणि ज्येष्ठांसाठी आवश्‍यक असलेल्या सुविधा लक्षात घेत ही घरे बांधली जात आहेत.

उतारवयात आजारपण आल्यानंतर ज्येष्ठांना आधाराची गरज असते. या आधारासाठी घरातदेखील काही बदल करावे लागतात. जेवण, आरोग्य, मनोरंजन आणि सुरक्षा अशा सर्वच बाबींमध्ये बदल होतात. त्यानुसार आवश्‍यक बांधकाम या प्रकल्पांत केले जात आहे. विशेष म्हणजे ज्येष्ठांसाठी सर्वोत्तम दर्जाच्या सुविधांसोबतच प्रशिक्षित डॉक्टर्स, केअरटेकर हेदेखील या ठिकाणी २४ तास उपलब्ध केले जात आहेत.

आरोग्यविषयक सेवांवर भर

आजारपणानंतर अथवा शस्त्रक्रियेनंतर ज्येष्ठ नागरिकांना देखभालीची आवश्यकता असते. अशा वेळी त्यांचे कुटुंबीय दूर असतील तर त्यांना नर्सिंग आणि केअरटेकर यांच्याकडून योग्य काळजी व वेळेवर रुग्णालयाशी संबंधित सर्व सुविधा उपलब्ध होणे गरजेच्या असतात. त्यामुळे या प्रकल्पांमध्ये आरोग्यविषयक सेवांवर भर दिला जातो, अशी माहिती विकसकांकडून देण्यात आली.

Senior Citizens
Pune: खंडणीचा गुन्हा दाखल न करण्यासाठी दीड लाखांची लाच घेताना सहाय्यक पोलीस निरीक्षकाला रंगेहाथ अटक

देशात ज्येष्ठ नागरिकांची लोकसंख्या जसजशी वाढत चालली आहे, तसे या घटकाचे महत्त्व आणि सर्वसमावेशक काळजी अधिकाधिक स्पष्ट होत आहे. सीनियर लिव्हिंगबाबत जागरूकता निर्माण करणे आवश्‍यक आहे. संवादाला चालना देण्यासाठी आणि ज्येष्ठ नागरिकांच्या विकसित होणाऱ्या गरजा पूर्ण करणाऱ्या परिवर्तनात्मक उपायांसाठी असे प्रकल्प निर्माण केले जात आहेत.

- आनंद नाईकनवरे, व्यवसाय विभागप्रमुख, नाईकनवरे डेव्हलपर्स

गृह प्रकल्पात या बाबींचा समावेश

  • आरोग्यविषयक गरजा पूर्ण करणारे बांधकाम

  • ज्येष्ठांना आवश्‍यक ते जेवण बनवता येईल अशी सोय

  • मनोरंजनाची व्यवस्था

  • सुरक्षिततेची योग्य ती काळजी

  • दैनंदिन गरजेसाठी आवश्‍यक असलेली दुकाने जवळ असतील

Senior Citizens
Pune Crime : आमच्या एरियात भाजी विक्री करायची नाही म्हणत सराईत गुन्हेगारांकडून दोघांना बेदम मारहाण

वय झाल्यानंतर निवांतपणे निसर्गाच्या सान्निध्यात जगता यावे, तसेच त्या ठिकाणी चांगल्या आरोग्यविषयक सुविधा मिळाव्यात व सुरक्षित वातावरण असावे म्हणून मी ज्येष्ठांसाठीच्या गृहप्रकल्पात सदनिका घेत आहे. बदललेल्या जीवनशैलीनुसार आवश्‍यक त्या गरजा पूर्ण व्हाव्यात आणि स्वतंत्रपणे आयुष्य जगता यावे, हादेखील हे घर घेण्यामागील हेतू आहे.

- केदार पटवर्धन, ज्येष्ठ नागरिक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.