ऑक्सफर्डमधील वॅक्सिनचे थेट पुणे कनेक्शन; भारताला होणार फायदा

oxford vaccine
oxford vaccine
Updated on

पुणे - ब्रिटनमधील ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीच्या कोरोना 19 वॅक्सिनची पहिली मानवी चाचणी यशस्वी झाली आहे. ब्राझीलमध्ये कऱण्यात आलेल्या मानवी चाचणीचे निष्कर्ष सकारात्मक असे आले आहेत. या ट्रायलमध्ये सहभागी झालेल्या लोकांमध्ये वॅक्सिनमुळे कोरोना विरुद्ध लढण्यासाठी प्रतिकारक्षमता विकसित झाली आहे. ऑक्सफर्डचे संशोधकही वॅक्सिन ChAdOx1 nCoV-19 (AZD1222) पूर्णपणे यशस्वी होण्याबाबत सकारात्मक आहेत. त्यांनाही विश्वास वाटतो की सप्टेंबरपर्यंत वॅक्सिन लोकांसाठी उपलब्ध होऊ शकेल. या वॅक्सिनचे उत्पादन AstraZeneca ही कंपनी करणार आहे. यासोबतच भारतातील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियासुद्धा यामध्ये सहभागी आहे. 

मानवी चाचणीच्या निष्कर्षाबाबत लँसेंटमधून माहिती देण्यात आली आहे. ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीत या वॅक्सिनची चाचणी करण्यात आली. त्याचे परीक्षण झाल्यानंतर असं समोर आलं की, लोकांमध्ये अँटिबॉडी आणि टी सेल्स तयार झाल्या आहेत. याच्या मदतीने मानवी शरीरात संसर्गाशी लढण्यासाठी आवश्यक प्रतिकारशक्ती तयार होते. आतापर्यंत तयार झालेल्या वॅक्सिनमुळे अँटिबॉडी तयार होते. मात्र ऑक्सफर्डचे वॅक्सिन अँटीबॉडीसह टी सेल्ससुद्धा तयार करत आहेत. सुरुवातीच्या चाचणीनंतर याची मोठ्या प्रमाणावर चाचणी घेण्यात येणार आहे. ब्रिटन, ब्राझिल आणि दक्षिण आफ्रिकेतील लोकांचा यामध्ये समावेश असेल. ऑक्सफर्डमधील वॅक्सिनचा ब्रिटनमधील लोकांवर पहिल्यांदा चाचणी घेण्यात आली होती. याआधी अमेरिकन कंपनी मॉडर्नाने कोरोना वॅक्सिनची पहिली चाचणी यशस्वीपणे पूर्ण केली आहे. 

भारतातील सीरम इन्स्टिट्यूटसुद्धा ऑक्सफर्डच्या या प्रोजेक्टमध्ये पार्टनर आहे. ही कंपनी जगात सर्वाधिक वॅक्सिन तयार करण्यासाठीही ओळखली जाते. या कंपनीने AstraZeneca सोबत टायअप केलं आहे. AstraZeneca ही कंपनी ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीसोबत वॅक्सिन तयार करत आहे. ऑक्सफर्डचा प्रोजेक्ट यशस्वी झाला तर सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया वॅक्सिनचे 100 कोटी डोस तयार करेल. यातील 50 टक्के भाग भारतासाठी असेल. आणि 50 टक्के गरीब व मध्यम उत्पन्न गटातील देशांना पाठवला जाईल. त्यामुळेच ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी वॅक्सिन तयार कऱण्यात यशस्वी झाल्यास भारताला कोरोनाविरुद्धच्या लढ्यात मोठी मदत होणार आहे. 

सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया ही कंपनी इम्युनोबायोलॉजिकल ड्रग्जची निर्मिती करते. यामध्ये वॅक्सिनचाही समावेश आहे. 1966 मध्ये सायरस पूनावाला यांनी या कंपनीची स्थापना केली होती. सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे मुख्यालय पुण्यात आहे. सध्या कंपनीचे सीईओ आदर पूनावाला हे आहेत.  ऑक्सफर्डमधील लसीच्या चाचणीला यश आल्यास कंपनीमध्ये तयार होणाऱ्या वॅक्सिनच्या डोसमधील 50 टक्के भाग भारतासाठी असेल असं आदर पूनावाला यांनी एका मुलाखतीत सांगितलं आहे. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.