Manchar News : घोडेगाव येथील दुय्यम निबंधक कार्यालयात सर्व्हर डाऊन; नागरिक त्रस्त

घोडेगाव (ता. आंबेगाव) येथील दुय्यम निबंधक कार्यालयात गुरुवारी दिवसभर सर्व्हर डाऊन झाले होते.
ghodegaon citizens
ghodegaon citizenssakal
Updated on

मंचर - घोडेगाव (ता. आंबेगाव) येथील दुय्यम निबंधक कार्यालयात गुरुवारी (ता. १०) दिवसभर सर्व्हर डाऊन झाले होते. त्यामुळे वडगावपीर, पारगाव तर्फे खेड, आहुपे, सातगाव पठार, रांजणी या दूरवरच्या भागातून आलेल्या नागरिकांची गैरसोय झाली.

आर्थिक व मानसिक त्रासालाही सामोरे जावे लागले. याचा फटका जमिनीचे खरेदी-विक्री व्यवहार करण्यासाठी मुंबई, पुण्याहून आलेल्या नातेवाईकांसह, बँका व पतसंस्थेच्या अधिकाऱ्यांनाही बसला.

दरम्यान सर्वसाधारण दरमाहिन्यात पाच ते सहा दिवस दस्त नोंदणी प्रणालीमधील तांत्रिक समस्या अथवा सर्व्हरच्या डाऊन होण्यामुळे दस्त नोंदणीचे काम थांबते किंवा संथगतिने सुरू असते. जमीन, सदनिका खरेदी-विक्री व कर्ज व्यवहारासाठी तारण आदी कामासाठी दस्त नोंदणी आवश्यक आहे.

सर्व्हरला अपेक्षित गती मिळत नसल्याने नागरिकांना ताटकळत उभे रहावे लागत आहे. तर काहींना दस्त नोंदणीसाठी दोन ते तीन दिवस हेलपाटे मारावे लागतात. यामध्ये विषेशतः जेष्ठ नागरिक, महिला व पुरूषांचे हाल होत आहेत.

'शासनाने यावर कायमस्वरूपी तोडगा काढावा.' अशी मागणी घोडेगाव येथील बाळासाहेब उर्फ कच्चर काळे पाटील व पारगाव तर्फे खेड (ता.आंबेगाव) येथील शेतकरी रमेश सावंत पाटील यांनी केली आहे.

दरम्यान सर्वर डाऊन असल्याने दुय्यम निबंधक कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना नागरिकांच्या रोशाला सामोरे जावे लागत आहे.

'दिवसभर सर्वर सुरु होण्याची वाट पहावी लागत असल्याने दस्तावर स्वाक्षरी करणारे साक्षीदार व विक्री करणारे या सर्वांचा हॉटेलचा खर्च, वेळप्रसंगी मुक्कामाचा खर्च करावा लागत असल्याने खरेदीदारांना मोठ्या प्रमाणात आर्थिक भुरदंड सहन करावा लागतो. वकिलांना ही दिवसभर पक्षकारासोबत दस्त नोंदणी होईपर्यंत वाट पहावी लागते. वेळ वाया जातो.'

- अँड शुभांगी पोटे, मंचर (ता. आंबेगाव)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()