Adhalrao Patil : हडपसर मतदारसंघातून सत्तर हजारांचे मताधिक्य मिळणार - आढळराव पाटील

गेल्यावेळी मला ५ लाख ७८ हजार मतदारांनी मतदान केले. त्यामुळे मी तो पराभव न समजता निकालाच्या दुसऱ्या दिवशी जनतेच्या सेवेत उतरलो. पदावर नसताना १६३८ कोटी रूपयांची कामे मतदारसंघात आणली.
seventy thousand votes will obtained from Hadapsar Constituency AdhalRao Patil
seventy thousand votes will obtained from Hadapsar Constituency AdhalRao PatilSakal
Updated on

हडपसर : गेल्यावेळी मला ५ लाख ७८ हजार मतदारांनी मतदान केले. त्यामुळे मी तो पराभव न समजता निकालाच्या दुसऱ्या दिवशी जनतेच्या सेवेत उतरलो. पदावर नसताना १६३८ कोटी रूपयांची कामे मतदारसंघात आणली.

हडपसरमधील मतदारांनी मला गेल्यावेळी आघाडी दिली होती. आजही येथील मतदार माझे स्वागत करीत असून यावेळी ते मला सत्तर हजारांची आघाडी देतील, असा विश्वास शिरूर लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी व्यक्त केला.

हडपसर मतदारसंघातील शिवसेनेच्या (शिंदे गट) वतीने शिरूर लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महंमदवाडी येथे पदाधिकारी मेळावा आयोजित केला होता. त्यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांशी संवाद साधताना माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील बोलत होते. दरम्यान, मेळाव्यात मतदारसंघातील काही कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.

शिवसेना प्रतोद आमदार भरत गोगावले, मेळाव्याचे आयोजक शिवसेना शहर प्रमुख प्रमोद भानगिरे, जिल्हाप्रमुख उल्हास तुपे, अरूण गिरे, डॉ. शंतनु जगदाळे, अभिमन्यू भानगिरे, अभिजित बोराटे, अमर घुले, विकी माने, संतोष रजपूत आदी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

माजी खासदार आढळराव पाटील म्हणाले, "आपल्या देशाचे आणि भावी पिढीचे भवितव्य ठरवणारी ही निवडणूक आहे. गेल्यावेळी आपण ज्याला मतदान केले तो परत आपल्याकडे आला का, हे विचारावे लागेल.

मी घरी न बसता पाच वर्षे गावोगावी फिरलो. मुख्यमंत्र्यांनी मला मतदारसंघ्याच्या विकासासाठी १६३८ कोटी रूपये दिले. त्यामध्ये पाणी योजनेची मोठी कामे झाली. खासदरकीच्या काळात सोलापूर महामार्ग, रेल्वे उड्डाणपूल उभारले.

शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावलेत. पाणीप्रश्नाची दाहकता मला प्रमोदनाना कायम सांगतात. त्यामुळे पुढच्या सहा महिन्यांत हा प्रश्न सोडविण्याचा माझा प्रयत्न राहील. त्याबाबत जशी पंतप्रधान मोदींची गँरंटी तशी माझी आहे.'

भरत गोगावले म्हणाले, "महायुतीतील तीनही नेत्यांच्या संमतीने शिरूरमधून आढळराव पाटलांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. सगळीकडे संभ्रमावस्था आहे. मात्र, ही केवळ एडजेस्टमेंट आहे.

आढळराव यांच्याबाबत सर्वांना माहीत आहे. सध्याचे खासदार पाच वर्षे कोठे होते, असे मतदार आता विचारत आहेत. मोदींना पुन्हा पंतप्रधान करायचे आहे. ते होणारही आहेत. मात्र, शिरूरसह महाराष्ट्रातून पंचेचाळीस आकडा आपल्याला द्ययचा आहे.

आपल्याला कामे करणारा की घरी बसणारा खासदार पाहिजे, हे आपल्याला ठरवायचे आहे. ते ठरवून हडपसरमधून सर्वाधिक आघाडी मिळेलच. तीनही पक्षातील पदाधिकाऱ्यांनी जबाबदारी घेतली तर त्यात काही अडचण राहणार नाही.' घड्याळ बांधल्यावर धनुष्यबाणाला विसरू नका, असा सल्लाही गोगावले यांनी यावेळी आढळराव यांना दिला.

शहर प्रमुख भानगिरे म्हणाले, "आढळराव पाटील शरिराने तिकडे असले तरी मनाने शिवसेनेत आहेत, हे विसरून चालणार नाही. मोदींना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी महायुतीच्या उमेदवारांना विजयी करण्याची जबाबदारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उचलली आहे.

ती आपण सर्वांनी पूर्ण करायची आहे. १५ वर्षात न झालेली विकासकामे पूर्ण करण्यासाठी त्यांच्या माध्यमातून सुमारे २५० कोटी रूपयांची कामे हडपसर मतदारसंघात सुरू आहेत. विविध जाती धर्मातील नागरिकांसाठीही त्यामुळे काम करता येत आहे.'

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()