जुन्नर तालुक्यात ऑक्सिजन सिलेंडरची तीव्र टंचाई

प्राणवायूच नाही तर प्राण कसा वाचवायचा ? डॉक्टरांचा सवाल
oxygen cylender 1.jpg
oxygen cylender 1.jpgesakal
Updated on

नारायणगाव : ''रेमीडिसिव्हर , प्लाझ्मानंतर जुन्नर तालुक्यात आज ऑक्सिजन सिलिंडरची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. आज दिवसभरात जुन्नर तालुक्यात ऑक्सिजन सिलिंडरचा पुरवठा झाला नाही. प्राणवायूच मिळत नसेल तर कोरोना अत्यवस्थ रुग्णांवर उपचार कसे करायचे? त्यांचा प्राण कसा वाचवायचा? असा प्रश्न तालुक्यातील कोविड उपचार केंद्रातील डॉक्टरापुढे निर्माण झाला आहे''अशी हतबलता तुळजाभवानी हॉस्पिटलचे डॉ. सुनील शेवाळे, खैरे कोविड उपचार केंद्राचे डॉ. लहू खैरे , विघ्नहर हॉस्पिटलचे सर्प व विषबाधा तज्ञ डॉ. सदानंद राऊत यांनी व्यक्त केली.

जुन्नर तालुक्यात मागील चोवीस तासात २६३ कोरोना रुग्ण आढळून आले. रोज कोरोना बाधित रुग्णांच्या व कोरोनामुळे मृत होणाऱ्यांची संख्या वाढत आहे. मागील आठ दिवसात तालुक्यात तेवीस जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. लेण्याद्री व ओझर येथील शासकीय कोविड उपचार केंद्रात सौम्य लक्षणे असलेले ५६९ रूग्ण उपचार घेत आहेत. चोवीस खाजगी हॉस्पिटलमध्ये कोरोना उपचार केंद्र सुरू केले आहेत. शिरोळी प्राथमिक आरोग्य केंद्र व नारायणगाव ग्रामीण रुग्णालयात सुमारे पन्नास ऑक्सिजन चे बेड आहेत.मात्र या ठिकाणी रूग्ण दाखल असल्याने नवीन रुग्णांना जागा नाही.

oxygen cylender 1.jpg
दहावी परीक्षा रद्द; अकरावीचा प्रवेश कसा?

तालुक्यातील २३ खाजगी कोविड उपचार केंद्रात १८६ साधे बेड , ३२३ ऑक्सिजन बेड, ८ व्हेंटिलेटर बेड व ५६ आयसीयु बेडची व्यवस्था करण्यात आली आहे.आज तालुक्यातील विविध रुग्णालयात दाखल असलेल्या ३२३ रुग्णांना कृत्रिम ऑक्सिजनची गरज आहे. रुग्णाच्या स्थिती नुसार तालुक्याला सुमारे दिवसभरात २१५ ऑक्सिजन सिलेंडरची गरज होती .आज चाकण व आळेफाटा येथील वितरकाकडून हॉस्पिटलला ऑक्सिजन सिलेंडरचा पुरवठाच झाला नाही. ऑक्सिजन सिलेंडर न आल्याने नवीन रुग्णांना दाखल करता आले नाही. तर दाखल रुग्णांना ऑक्सिजनची टंचाई निर्माण झाली. अत्यवस्थ रुग्णांचा प्राण वाचवण्यासाठी ऑक्सिजनची गरज असते.प्राण वायूच मिळत नसेल तर रुग्णांचा प्राण कसा वाचणार असा प्रश्न डॉ. शेवाळे व डॉ.खैरे यांनी व्यक्त केला .

''प्रयत्न करूनही आज चाकण येथून ऑक्सिजन सिलेंडर मिळाले नाहीत ही वस्तुस्थिती आहे. अनपेक्षित अत्यवस्थ रुग्ण वाढल्याने राज्यात रेमीडिसिव्हर , प्लाझमा व ऑक्सिजन सिलेंडरची मागणी वाढून टंचाई वाढली आहे. सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांसाठी तालुक्यात बेड आहेत.मात्र अत्यवस्थ रुग्णांसाठी बेड शिल्लक नाहीत.कोरोना रुग्णांनी तालुक्यात आज दहा हजाराचा टप्पा पूर्ण केला असून मृत्यूचे त्रिशतक पूर्ण केले आहे. या मुळे नागरिकांनी काळजी घेणे आवश्यक आहे.''

- डॉ. शाम बनकर ( तालुका आरोग्य अधिकारी )

oxygen cylender 1.jpg
जनरल मोटर्सच्या 1419 कामगारांना ‘ले-ऑफ’

जुन्नर तालुक्याची स्थिती :

एकुण कोरोनाबाधित रुग्णसंख्या : १० हजार ३१२

बरे झालेले रुग्ण : ८ हजार ३६४

मृत्यु झालेल्या रुग्णांची संख्या : ३१0

उपचार सुरु असलेले रुग्ण : १ हजार ६३८

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()