Sharad Mohol: खळबळजनक! धनकवडीत शरद मोहोळच्या श्रद्धांजली बॅनरवर 'देशभक्त' असा उल्लेख

पुण्यातील कुख्यात शरद मोहोळ याची नुकतीच गँगवॉरमधून गोळ्या घालून हत्या करण्यात आली.
Sharad Mohol
Sharad Mohol
Updated on

पुणे : पुण्यातील कुख्यात गुंड शरद मोहोळ याची नुकतीच गँगवॉरमधून गोळ्या घालून हत्या करण्यात आली. या घटनेमुळं पुणे शहरात खळबळ उडाली होती. पण आता आणखी एक खळबळजनक घटना समोर आली आहे. ती म्हणजे मोहोळच्या श्रद्धांजलीसाठी लावलेल्या बॅनरवर त्याचा 'देशभक्त' असा उल्लेख करण्यात आला आहे. विशेष म्हणजे पोलिसांनीही याकडं दुर्लक्ष केल्यानं हा शहरात चर्चेचा विषय ठरला आहे. (sharad mohol mentioned as desh bhakt on tribute banner in dhankawadi pune)

Sharad Mohol
Rohit Pawar on Narvekar: "भाजपच्या बड्या नेत्याचं ऐकून नार्वेकरांनी दिला निकाल"; रोहित पवारांचा गंभीर आरोप

नितेश राणेंनी घेतली होती कुटुंबाची भेट

शरद मोहोळची पत्नी स्वाती मोहोळ या भाजपच्या सदस्य आहेत. त्यामुळं नुकतीच भाजपचे आमदार नितेश राणे यांनी मोहोळच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचं स्वांत्वन केलं होतं. यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी शरद मोहोळचा हिंदुतत्वादी असा उल्लेख करत त्यानं हिंदुत्वासाठी काम केल्याचं सांगितलं होतं. (Latest Marathi News)

Sharad Mohol
Devendra Fadnavis: फडणवीसांचं भाषण सुरु असतानाच लाभार्थांचा राडा; शेकडो लोकांनी पळवले आरोग्य कीट

हिंदुत्वासाठी काम केलं म्हणून हत्या - स्वाती मोहोळ

दरम्यान, याचवेळी स्वाती मोहोळ यांनी देखील आपल्या पतीची हत्या ते हिंदुत्वासाठी काम करत होते म्हणून झाल्याचा दावा केला होता. तसेच पतीच्या हत्येमुळं आपण खचून जाऊन असं कोणी समजू नये कारण मी एका हिंदुत्वाद्याची पत्नी आहे, असं सांगतानाच माझा पती वाघ होता तर मी त्याची वाघीण आहे, असंही स्वाती मोहोळ यांनी म्हटलं होतं. (Marathi Tajya Batmya)

Sharad Mohol
India-Maldives Row: 'राष्ट्र प्रथम व्यवसाय नंतर', भारत मालदीव वादात 'या' कंपनीची जाहिरात चर्चेत

यानंतर आता शहरातील धनकवडी भागात शरद मोहोळच्या समर्थकांकडून त्याच्या श्रद्धांजलीपर बॅनर झळकवले विशेष म्हणजे त्यावर शरद मोहोळचा उल्लेख देशभक्त म्हणून करण्यात आला आहे. अद्यापही हे बॅनर त्याच ठिकाणी असल्यानं पोलिसांनी अद्याप यावर कुठलीही कारवाई न केल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()