Sharad Mohol Murder : कातील सिद्दीकी हत्येमुळेच मोहोळवर गोळीबार; हिंदूत्ववादी संघटनाचा दावा, पुण्यात काढणार जनमोर्चा

हिंदूत्ववादी संघटनांकडून कुख्यात गुंड शरद मोहोळ याच्या हत्येच्या कटामागील सूत्रधार शोधला गेला पाहिजे अशी मागणी करण्यात आली आहे.
Sharad Mohol murder case new update News Marathi
Sharad Mohol murder case new update News Marathi
Updated on

पुणे शहरातील कोथरूड परिसरात पाच जानेवारीला दुपारी कुख्यात गुंड शरद मोहोळवर गोळ्या झाडून त्याचा खून करण्यात आला होता. यानंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपींच्या मुसक्या देखील आवळल्या आहेत. या प्रकरणात दररोज वेगवेगळ्या अपडेट समोर येत आहेत. यादरम्यान या प्रकरणात आता हिंदुत्ववादी संघटना देखील समोर आल्या आहेत.

या हिंदूत्ववादी संघटनांकडून मोहोळ याच्या हत्येच्या कटामागील सूत्रधार शोधला गेला पाहिजे अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच जर्मन बेस्ट बेकरी स्फोटातील संशयित दहशतवादी कातील सिद्दकी याच्या हत्येचं शरद मोहळ हत्याकांडाशी कनेक्शन असल्याचा दावा देखील करण्यात आला आहे. (Sharad Mohol murder case new update News Marathi)

शरद मोहोळ हत्या प्रकरणात मिलींद एकबोटे सह हिंदुत्ववादी संघटनांची पत्रकार परिषद घेत, हत्येच्या कटामागचा सूत्रधार पोलिसांनी शोधला पाहिजे अशी मागणी करण्यात आली आहे.

पुण्यात एका हॉटेलमध्ये कट रचला त्याचा सीसीटीव्ही फुटेज सापडत नाही, याबाबत पोलिसांना माहिती दिली आहे. गाडीत पैसे सापडले त्याचा तपास होत नाही, पिस्तुल सापडले त्याचा तपास नाही. यामागे राजकिय दबाव असण्याची शक्यता मिलिंद एकबोटे आणि इतर हिंदुत्ववादी संघटनानी व्यक्त केली आहे.

Sharad Mohol murder case new update News Marathi
Sakal Podcast : मालदीवच्या राष्ट्रपतींना मोठा झटका! निवडणुकीत दारुण पराभव ते शिवसेना प्रवेशानंतर मिलिंद देवरांनी केलं मन मोकळं

पुण्यात काढला जाणार मोर्चा

शरद मोहोळ यांनी गो रक्षण चळवळ मोहोळ यांनी वाढवली होती. तसेच कातील सिद्दीकी याची हत्या केली होती, त्यामुळे अतिरेकी संघटनांनी काही कटकारस्थान केलं का अशी शंका आहे. शरद मोहोळ यांच्या हत्ये मागील कट कारस्थाने उघडकीस आणले पाहिजे. मोहोळ हत्या तपास राष्ट्रीय तपासणी यंत्रणेकडे सोपवण्यात यावा अशी सकल हिंदू समाजाची मागणी असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

महाराष्ट्रातील हिंदुत्ववादी संघटना २८ जानेवारी २०२४ ला पुण्यात एक जन मोर्चा काढला जाणार आहे. किनारा हॉटेल ते श्री शिवाजी महाराज स्मारक कोथरूड इथपर्यंत हा मोर्चा काढणार असल्याचे देखील यावेळी सांगण्यात आले.

Sharad Mohol murder case new update News Marathi
Sharad Mohol Case: शरद मोहोळ खून प्रकरणातील मुख्य आरोपीसह सहाजण ताब्यात, नवी मुंबई पोलिसांची कारवाई

आंतरराष्ट्रीय कट असू शकतो

शरद मोहोळ हत्या प्रकरणाची फेरतपासणी झाली पाहिजे, पोस्टमार्टम रिपोर्टची चौकशी झाली पाहीजे. जे आरोपी आहेत ते सामान्य आहेत, यांना पैसे देऊन वापरले आहे, या मागचा मास्टरमाइंड शोधला पाहिजे. कातील सिद्दीकी हत्या प्रकरणामुळे शरद मोहोळ हत्या झाली असं माझं ठाम मत आहे, त्यामुळे आंतरराष्ट्रीय कट असू शकतो असं आम्हाला वाटतं असं मत एकबोटे यांनी व्यक्त केलं.

सामाजिक कार्य, धर्म कार्य, गो रक्षण चळवळ जोरात सुरु होती, आम्ही सामजिक कार्यात सहभागी झालो आहोत. देव देश धर्म याला न्याय देणाऱ्या व्यक्तीला न्याय मिळाला पाहिजे. हिंदुत्व विरोधी लोकांनी वापरले आणि टोळीयुद्ध आहे, असं दाखवण्याचा प्रयत्न केला जातोय. देवेंद्र फडणवी यांना अपुरी माहिती होती त्यामुळे त्यांना सर्व माहिती देण्यात आलीय,स्वाती मोहोळ यांनी संपूर्ण माहिती फडणवीस यांना दिली आहे. राजकारण आणि समाजकारण मध्ये शरद मोहोळ याचा कोणाशी वाद नव्हता असेही एकबोटे यावेळी म्हणाले.

Sharad Mohol murder case new update News Marathi
अयोध्येत उद्यापासून भक्तीचा आनंदोत्सव; राज्यातील २६ पुरोहितांना निमंत्रण; 'असे' आहेत धार्मिक कार्यक्रम

कोथरूड परिसरात पाच जानेवारीला दुपारी शरद मोहोळवर पिस्तुलातून गोळ्या झाडून खून करण्यात आला होता. या प्रकरणी गुन्हे शाखेने त्याचदिवशी रात्री साहिल ऊर्फ मुन्ना संतोष पोळेकर, नामदेव कानगुडे, विठ्ठल गांदले, अमर कानगुडे, चंद्रकांत शेळके, विनायक गव्हाणकर यांच्यासह दोन वकिलांना अटक केली होती. त्यानंतर पोलिसांनी या गुन्ह्यात नितीन अनंता खैरे, आदित्य विजय गोळे आणि संतोष दामोदर कुरपे यांना अटक केली. या गुन्ह्यात आत्तापर्यंत एकूण १३ आरोपींना अटक करण्यात आली आहे.

दरम्यान, या गुन्ह्यात आणखी काहीजणांचा सहभाग असल्याचा पोलिसांना संशय आहे. गुन्हे शाखेच्या तपास पथकाने काल मध्यरात्री पनवेल परिसरात कारवाई केली. या कारवाईत संशयित विठ्ठल शेलार याच्यासह सहाजणांना ताब्यात घेण्यात आले आहे. शेलार टोळीचे हिंजवडी, मुळशी भागात वर्चस्व असून, त्याच्याविरुद्ध गुन्हे दाखल आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.