Sharad Mohol : खून प्रकरणात वकिलांसह सात आरोपींना १७ फेब्रुवारीपर्यंत मोक्का कोठडी

कुख्यात गुंड शरद मोहोळ खून प्रकरणात अटक केलेल्या दोन वकिलांसह सात आरोपींना विशेष न्यायाधीश व्ही. आर. कचरे यांनी १७ फेब्रुवारीपर्यंत मोक्का कोठडी सुनावली आहे.
Sharad Mohol Murder Case
Sharad Mohol Murder Case sakal
Updated on

पुणे - कुख्यात गुंड शरद मोहोळ खून प्रकरणात अटक केलेल्या दोन वकिलांसह सात आरोपींना विशेष न्यायाधीश व्ही. आर. कचरे यांनी १७ फेब्रुवारीपर्यंत मोक्का कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार गणेश मारणे व विठ्ठल शेलार यांच्यासह सर्व आरोपी आता मोक्का कोठडीत असून, त्यांची समोरासमोर चौकशी केली जाणार आहे.

मोहोळच्या खून प्रकरणात अटक करण्यात आलेल्या सर्व आरोपींवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यांतर्गत (मोक्का) कारवाई करण्याचे आदेश पोलिस आयुक्तांनी दिला आहे. या आरोपींना सोमवारी (ता. १२) प्रथमच मोक्का न्यायालयात हजर करण्यात आले.

तत्पूर्वी गुन्ह्यात अटक केलेल्या अॅड. रवींद्र पवार, अॅड. संजय उडान, धनंजय मारुती वटकर, नितीन अनंता खैरे, आदित्य विजय गोळे, संतोष दामोदर कुरपे आणि रामदास ऊर्फ वाघ्या मारणे यांना न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात आले होते.

‘या सर्व आरोपींची गुन्ह्याच्या कटातील सहभाग निष्पन्न करण्यासाठी समोरासमोर चौकशी करायची आहे, तसेच त्यांच्या मालमत्तेबाबत सखोल तपास करायचा आहे,’ असे तपास अधिकारी सहायक पोलिस आयुक्त सुनील तांबे आणि विशेष सरकारी वकील प्रमोद बोंबटकर यांनी न्यायालयात सांगितले. न्यायालयाने सरकार आणि बचाव पक्षाचा युक्तिवाद ऐकल्यावर आरोपींना मोक्का कोठडी सुनावली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.