पुणे - शरद मोहोळ खून प्रकरणातील संशयित मास्टरमाइंड गणेश मारणे (ganesh marne)फरार असून, गुन्हे शाखेच्या पथकांकडून त्याचा कसून शोध घेण्यात येत आहे. दरम्यान, या गुन्ह्यातील आरोपींविरुद्ध संघटित गुन्हेगारी नियंत्रण (मोका) कायद्यान्वये कारवाई होण्याची शक्यता असून, त्यादृष्टीने पोलिसांनी कायदेशीर तयारी सुरू केली आहे.
(Sharad Mohol murder case mastermind Ganesh Marne )
साहिल ऊर्फ मुन्ना पोळेकर आणि त्याच्या साथीदारांनी कोथरूड परिसरात पाच जानेवारीला शरद मोहोळचा गोळ्या झाडून खून केला होता. या प्रकरणी गुन्हे शाखेने आत्तापर्यंत विठ्ठल महादेव शेलार आणि रामदास ऊर्फ वाघ्या नानासाहेब मारणे (दोघे रा. मुळशी) यांच्यासह १५ जणांना अटक केली आहे. याशिवाय आणखी नऊ जणांना ताब्यात घेतले असून, त्यांची चौकशी करण्यात येत आहे.
शेलार आणि गणेश मारणे यांनी मोहोळच्या खुनाचा कट रचला. मोहोळचा खून होण्यापूर्वी एक महिना अगोदर शेलार आणि गणेश मारणे यांची बैठक झाली होती, ही बाब पोलिस तपासात समोर आली आहे. शेलार याच्याविरुद्ध खून, खुनाचा प्रयत्न आणि खंडणीचे गुन्हे दाखल आहेत.
where is ganesh marne
वाघ्या मारणेवर दरोडा, खंडणीचे गुन्हे
मुळशी तालुक्यातील आंबेगाव, उरावडे गावातील रामदास ऊर्फ वाघ्या मारणे हा गणेश मारणे टोळीत पूर्वीपासून सक्रिय आहे. वाघ्या मारणेविरुध्द यापूर्वी दरोड्याचा प्रयत्न, खंडणीचे गुन्हे दाखल आहेत. एप्रिल २०११ मध्ये पुणे-बंगळूर महामार्गावरील एका पेट्रोलपंपावर दरोडा टाकण्याच्या प्रयत्नात असलेल्या आठजणांना खंडणीविरोधी पथकाने अटक केली होती.
who is ramdas alias waghya marne
त्यांच्याकडून पिस्तूल, तीन जिवंत काडतुसे, कोयता, सुरा, तलवार अशी घातक शस्त्रे जप्त केली होती. त्या आरोपींमध्ये वाघ्या मारणेचा सहभाग होता. तसेच, डिसेंबर २०१३ मध्ये गणेश मारणे टोळीतील दोन सराईत गुन्हेगारांना गुन्हे शाखेच्या दरोडा प्रतिबंधक पथकाने अटक केली होती. त्यावेळी त्याच्याविरुद्ध मोका कायद्यान्वये कारवाई करण्यात आली होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.