Sharad Pawar: इंदापूरचा भावी आमदार कोण? शरद पवार याचं सूचक विधान

Ncp Latest NewsL तुम्हीच ठरवलेले होते, दीड लाखांहून अधिक मताधिक्याने आपला उमेदवार विजयी झाला.
Sharad Pawar: इंदापूरचा भावी आमदार कोण?  शरद पवार याचं सूचक विधान
Updated on

Baramati latest News: यंदा महाविकास आघाडीच्या वतीने जागांबाबत निर्णय घेण्याचे अधिकार संजय राऊत, नाना पटोले व जयंत पाटील यांना दिलेले आहेत, इच्छुकांना विचारण्यापेक्षाही सामान्य कार्यकर्त्यांना विचारुन व सर्वेक्षणाचा अंदाज घेऊन उमेदवार ठरवले जातील, अशी माहिती ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी दिली.

इंदापूर तालुक्यातील तुतारीच्या चिन्हावर आगामी विधानसभा निवडणूक लढविण्याची इच्छा असलेले उमेदवार व त्यांच्या समर्थकांनी रविवारी (ता. 29) शरद पवार यांची त्यांच्या गोविंदबाग निवासस्थानी भेट घेत आपले म्हणणे मांडले. त्यांच्या समोर बोलताना शरद पवार यांनी ही माहिती दिली.

या प्रसंगी दशरथ माने, अप्पासाहेब जगदाळे, प्रवीण माने, महारुद्र पाटील, अशोक घोगरे, तेजसिंह पाटील, अमोल भिसे, यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

Sharad Pawar: इंदापूरचा भावी आमदार कोण?  शरद पवार याचं सूचक विधान
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाच्या कोल्हापूर ग्रामीण जिल्हा उपाध्यक्ष पदी आदिक जाधव यांची निवड

शरद पवार म्हणाले, पंतप्रधान लोकसभेच्या वर त्यांच्या चारशे जागा येतील असे सांगत होते, आज महाराष्ट्रातील वातावरण बदलले आहे. यंदा आम्ही दहा जागा लोकसभेच्या लढविल्या, त्यातील आठ जागांवर विजय मिळाला, यंदा लोकांनीच बदल करायचा निर्णय घेतला होता. नेत्यांनी काही सांगितले तरी लोकांनी त्यांना जे योग्य वाटले तो निर्णय घेतला. बारामतीतही अनेक नेत्यांनी भाषणे केली, पण तुम्हीच ठरवलेले होते, दीड लाखांहून अधिक मताधिक्याने आपला उमेदवार विजयी झाला.

काही लोकांना आभाळाकडे बघून पाऊस पडेल की नाही ते समजते, आता अनेकांना वाटू लागले आहे की पाऊस पडेल त्या मुळे आपल्याकडील गर्दी वाढू लागली आहे. राज्यात कुठही गेलो तरी हजारोंच्या संख्येने लोक जमतात, लोकांनीच या निवडणूकीत जिंकायच ठरवले आहे, त्या मुळे यंदा चांगले निकाल लागतील यात शंका नाही.

महाविकास आघाडी तीन पक्षांची आहे, प्रत्येक तालुक्यात सर्वेक्षण होईल, इच्छुकांना नाही तर कार्यकर्त्यांना विचारुन मगच निर्णय घेतला जाईल, आगामी दहा दिवसात हे काम पूर्ण होईल. माझा अंदाज आहे की 6 ते 10 ऑक्टोबर दरम्यान आयोग तारखा जाहीर करतील. 15 ते 20 नोव्हेंबर दरम्यान मतदान होईल.

Sharad Pawar: इंदापूरचा भावी आमदार कोण?  शरद पवार याचं सूचक विधान
Sharad Pawar: जयंत पाटलांनी घेतली 'या' नेत्याची भेट, सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या!

या पार्श्वभूमीवर पुढील काही दिवसात आम्ही उमेदवार निश्चित करु. इंदापूरच्या बाबतीतही सर्वांशी विचारविनिमय करुन मगच निर्णय घेतला जाईल. यंदा इंदापूरमध्ये बदल घडेल अस वातावरण आहे, त्या मुळे निवडून येण्याची क्षमता विचारात घेत सर्वांना विश्वासात घेऊन अंतिम निर्णय घेऊ, अशी ग्वाही शरद पवार यांनी उपस्थितांना दिली.

आघाडी म्हणून लढणार असल्याने काही जागा मित्रपक्षांना द्याव्या लागणार आहेत, निवडणूकीत त्यांचेही काम करावे लागणार आहे. तुम्हाला तुमचे म्हणणे मांडायचा अधिकार आहे, पण इंदापूरचा पुढचा आमदार आपलाच असेल हे लक्षात घेत सर्वांनी कामाला लागा, असा कानमंत्रच शरद पवार यांनी इंदापूरच्या कार्यकर्त्यांना दिला.

नको माजी नको आजी आम्हाला हवा नवीन बाजी.....

इंदापूर तालुक्यातील शिष्टमंडळाने शरद पवार यांच्याकडे निष्ठावान कार्यकर्त्याला संधी देण्याची मागणी केली. नको माजी नको आजी आम्हाला हवा नवीन बाजी या शब्दात कार्यकर्त्यांनी पवार यांच्यासमोर भावना व्यक्त केल्या. माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांना तुतारीच्या कार्यकर्त्यांनी कडाडून विरोध केल्याने पाटील यांच्यापुढे आता अडचणी वाढल्या आहेत.

Sharad Pawar: इंदापूरचा भावी आमदार कोण?  शरद पवार याचं सूचक विधान
Sharad Pawar यांचा मुंडे भाऊ-बहि‍णीला मोठा धक्का, राजेभाऊ फड विधानसभेला जड जाणार?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.