राष्ट्रवादी व राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षादरम्यान बारामतीतील महात्मा गांधी बालक मंदीर या मतदान केंद्रावर दुपारी एकच्या सुमारास जोरदार बाचाबाची झाली. या प्रकरणी शर्मिला पवार त्या ठिकाणी पोहोचल्या, त्या पाठोपाठ उपमुख्यमंत्री अजित पवार हेही तेथे पोहोचले.
शर्मिला पवार यांनी अजित पवार यांच्या कार्यकर्त्यांवर केलेल्या आरोपांचा स्वताः अजित पवार यांनी इन्कार केला. काही काळ या ठिकाणी तणावाचे वातावरण तयार झाले होते.