बारामती : विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या सांगता सभा नेहमीच्या प्रथेप्रमाणे ज्येष्ठ नेते शरद पवार व उपमुख्यमंत्री अजित पवार हे बारामतीत घेणार आहेत. यंदा परस्परांच्या विरोधात मतदारांना ते मतदानाचे आवाहन करणार असल्याने बारामतीकर शरद पवार यांच्या हाकेला ओ देतात की अजित पवार यांनाच पुन्हा संधी देतात, याकडे अवघ्या राज्याचे लक्ष लागून राहिले आहे.