मोदींची स्तुती करणाऱ्या मित्राचे पवारांकडून कौतुक

डॉ.पूनावाला यांनी मोदींचे कौतुक केल्याने सोशल मिडीयावर हा चर्चेचा विषय ठरला होता
मोदींची स्तुती करणाऱ्या मित्राचे पवारांकडून कौतुक
मोदींची स्तुती करणाऱ्या मित्राचे पवारांकडून कौतुक sakal
Updated on

पुणे : जगभरातील लोकांना कोरोनाची (corona) लस पुरविणाऱ्या सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे (Serum Institute of India) संस्थापक डॉ. सायरस पूनावाला (cyrus poonawala) यांना नुकतेच लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले होते. यावेळी बोलताना डॉ. पूनावाला यांनी मोदींची स्तुती केली होती. ते म्हणाले, ‘‘पूर्वी मोठ्या प्रमाणावर लायसन्स राज होते. आता मोदींच्या काळात चहा-पाण्याची पद्धत बंद झाली असून, जलद गतीने परवानग्या मिळत आहे.’’ राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (sharad pawar) यांचे वर्ग मित्र असलेल्या डॉ.पूनावाला यांनी मोदींचे कौतुक केल्याने सोशल मिडीयावर हा चर्चेचा विषय ठरला होता.

आता शरद पवारांनीच डॉ. पूनावाला यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार भेटल्याबद्दल अभिनंदन केले आहे. यासंबंधी त्यांनी एक पत्रकही काढले आहे. ते म्हणतात, ‘‘सिरम इन्स्टिट्यूटने उत्पादित केलेली कोरोनावरील कोव्हिशिल्ड लस जीवनदायी ठरली आहे. त्यांच्या नेतृत्वात जगभरात कोट्यवधी लशी वितरित करण्यात आल्या. ज्यामुळे लाखो लोकांचे प्राण वाचले आहे. म्हणूनच, हा पुरस्कार त्यांच्याद्वारे प्रदान केलेल्या उदात्त सेवेचा योग्य सन्मान आहे.’’

मोदींची स्तुती करणाऱ्या मित्राचे पवारांकडून कौतुक
"लायकीत रहायचं अन्यथा....", संभाजी ब्रिगेडला मनसेचा इशारा

"डॉ. पूनावाला हे सहानुभूती, करुणा आणि नैतिक व्यावसायिकतेचे प्रतीक असून, त्यांनी कोरोना साथीच्या काळातही अनेक अडचणींचा सामना करत कोव्हिशिल्डचे यशस्वी उत्पादन केले आहे. जगभरातील नागरिक तुमच्याया कार्याबद्दल कृतज्ञ आहे. एस.एम जोशी, इंदिरा गांधी, डॉ मनमोहन सिंग आणि अटल बिहारी वाजपेयींसारख्या दैदीप्यमान कर्तृत्व असलेल्या लोकांना हा पुरस्कार प्राप्त झाला आहे. आता त्यात तुमचे नाव पाहून आनंद होतोय, मानवजातीच्या सेवेसाठी तुम्हाला दीर्घायुष्य लाभो याच सदिच्छा," असल्याचे पवारांनी पत्रकात म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.