Sharad Pawar : आजवर झालेल्या ईडी कारवायांची शरद पवारांनी दिली आकडेवारी; इतक्या प्रकरणांमध्ये....

Sharad Pawar : अजित पवार अनेकदा राज्याच्या विकासासाठी पक्ष सोडला आणि सत्तेत आलो असं सांगतात. मात्र, आज शरद पवारांनी त्यांच्या त्या वक्तव्यावर बोलत अजित पवारांना टोला लगावला आहे.
Sharad Pawar
Sharad PawarEsakal
Updated on

राष्ट्रवादीच्या आमदारांना सोबत घेत अजित पवारांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. शपथ घेतल्यानंतर अजित पवार यांनी राष्ट्रवादी पक्षावर दावा ठोकला त्यानंतर निवडणूक आयोगाने पक्ष चिन्ह आणि पक्षाचं नावं हे अजित पवार गटाला दिलं. दरम्यान, अजित पवार अनेकदा राज्याच्या विकासासाठी पक्ष सोडला आणि सत्तेत आलो असं सांगतात. मात्र, आज शरद पवारांनी त्यांच्या त्या वक्तव्यावर बोलत अजित पवारांना टोला लगावला आहे.

'काही लोक राज्याच्या विकासासाठी भाजपसोबत गेलो असं सांगत आहेत. मात्र, हा दावा अजिबात सत्य नाही. काही नेत्यांची तपास यंत्रणांकडून चौकशी सुरु होती. ती चौकशी सत्तेत गेल्यावर बंद झाली. त्यामुळे विकासासाठी पक्ष सोडला, असं म्हणणं चूक आहे, अशा शब्दात शरद पवारांनी अजित पवारांवर हल्लाबोल केला आहे. ते रविवारी पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या पक्षाच्या मेळाव्यात बोलत होते.

'तुम्ही जागृत राहा आणि कष्ट करा. महाराष्ट्र तुमच्यासोबत राहील. जनतेची सहानुभूती आणि संमती तुम्हाला मिळाल्याशिवाय राहणार नाही,' असंही शरद पवार यांनी म्हटलं आहे.

Sharad Pawar
Ganpat Gaikwad Firing Case : गणपत गायकवाड यांचा ड्रायव्हर रणजीत यादवला अटक; मुलगा अद्याप फरार

ईडी कारवाईबाबत काय म्हणाले शरद पवार?

पुढे बोलताना शरद पवार म्हणाले, 'आज देशात कोणीही भाजपच्या विचाराच्या विरोधात भूमिका घेतली की त्याच्याविरोधात सत्तेचा गैरवापर केला जात आहे. यापूर्वी महाराष्ट्रात ED हा शब्द कोणालाही माहिती नव्हता. परंतु, गेल्या काही वर्षांमध्ये ED हा शब्द देशाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचला आहे. या काळात ईडीचा गैरवापर झाला.

२०१४ ते २०२३ या काळात ईडीकडून एकूण सहा हजार केसेस नोंदवल्या गेल्या. चौकशीनंतर त्यापैकी केवळ २५ प्रकरणांमध्ये तथ्य असल्याचे आढळून आले आहे. मात्र, या २५ पैकी फक्त दोघांना शिक्षा झाली. ईडीच्या या सगळया कामासाठी जवळपास ४०४ कोटी रुपये खर्च झाले, असंही शरद पवार यांनी यावेळी बोलताना सांगितले आहे.

ईडी कोणाच्या मागे लागली, याकडेही पाहिले पाहिजे. गेल्या काही वर्षांमध्ये अनेक नेत्यांच्या चौकशा झाल्या. यापैकी ८५ टक्के नेते हे विरोधी पक्षातील आहेत. भाजप सत्तेत आल्यापासून ईडीचा हत्यारासारखा वापर केला जात आहे. भाजपच्या काळात १२१ नेत्यांवर ईडीची कारवाई झाली. परंतु, कारवाई झालेल्या लोकांमध्ये भाजपच्या एकाही नेत्याचा समावेश नाही, असंही त्यांनी म्हटलं आहे.

Sharad Pawar
सोलापूरमध्ये पोलिस बंदोबस्तात 'निर्भय बनो'! कार्यक्रमाला येणाऱ्यांची पोलिसांकडून झडती

ईडी कोणाच्या मागे लागली, याकडेही पाहिले पाहिजे. गेल्या काही वर्षांमध्ये अनेक नेत्यांच्या चौकशा झाल्या. यापैकी ८५ टक्के नेते हे विरोधी पक्षातील आहेत. भाजप सत्तेत आल्यापासून ईडीचा हत्यारासारखा वापर केला जात आहे. भाजपच्या काळात १२१ नेत्यांवर ईडीची कारवाई झाली. परंतु, कारवाई झालेल्या लोकांमध्ये भाजपच्या एकाही नेत्याचा समावेश नाही, असंही त्यांनी म्हटलं आहे.

Sharad Pawar
Sanjay Raut: संजय राऊतांचा धडाका सुरूच! मुख्यमंत्र्यांचा गुंडासोबतचा आणखी एक फोटो केला शेअर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.