पुण्यात साखर परिषदेत राज्यातील मोठ्या नेत्यांनी उपस्थिती लावली. शरद पवारांसोबत राज्यातील मंत्री या परिषदेला हजर होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संबोधन केलं. महाराष्ट्रात यंदा विक्रमी साखरेचं उत्पादन झालं आहे. ही येणाऱ्या काळात साखर निर्यातीसाठी संधी असल्याचं शरद पवार यांनी म्हटलं. Sharad Pawar In Sugar Summit)
साखर उत्पादनात ब्राझीलचा पहिला नंबर होता. आता तो भारताने घेतला आहे, असं पवार म्हणाले. या वर्षी सगळ्यात जास्त उत्पादन महाराष्ट्रातून झालं. ही प्रगती झाल्याचा आनंद त्यांनी व्यक्त केला.आता यापुढे जाऊन दिशा शोधाव्या लागतील. गेल्या २ वर्षात पाऊस चांगला झाला. यामुळे आता उसाचे क्षेत्र अजून वाढेल, असा विश्वास राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केला.
निर्यातीवर लक्ष्य ठेवावं लागेल
काही हवामान तज्ञ यांच्या मते या वर्षी पाण्याची स्थिती चांगली राहील. ऊसतोडणी च नियोजन कारखाने सुरू होण्यापूर्वी करावं लागेल. कारखाने यांनी यागोष्टी ची अंमलबजावणी होईल याची खात्री घ्यावी. साखरेची निर्यात देखील चांगली झाली. यावर्षी विक्रमी साखर तयार होईल असं दिसत असल्याचं पवार म्हणाले. या वर्षी भारतातून ९० लाख टन साखर निर्यात होऊ शकते.
गेल्या ३ हंगामापासून कारखानदारांनी साखर निर्यात केली. या हंगामात ६४ लाख टन निर्यात साखरेचे करार झाल्याची माहिती त्यांनी दिली. हा साखर उद्योगाला दिलासा आहे.
महत्वाचे मुद्दे
अफगाणिस्तान हा गिऱ्हाईक आहे पण ३ लाख टन पर्यंत खाली आली आहे
बांगलादेश आणि इंडोनेशिया या २ देशांनी जास्त साखर खरेदी केली
१२१ देशात साखर भारतातून गेली ही अभिमानाची गोष्ट आहे
VSI आणि पुणे इंजिनियरिंग कॉलेजमध्ये करार झाला आहे. कारखाने आणि शेतकऱ्यांची स्थिती सक्षम होण्यासाठी याची मदत होईल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.