मराठा आरक्षणावरून राज्यातील राजकारण तापलं आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोवर कोणत्याही नेत्याला गावात, आपल्या भागात फिरकू देणार नाही अशी भुमिका अनेक भागातील, गावातील मराठा समाजाने घेतली आहे. दरम्यान, आज पुण्यात अलका चौकाजवळ शरद पवार यांचा ताफा अडवण्यात आला आहे.
शरद पवार यांचा ताफा अडवणाऱ्या मराठा समाजातील आंदोलकांना पोलिसांनी अडवलं आहे. त्याचबरोबर शरद पवार गो बॅकचे पोस्टर हातामध्ये घेऊन मराठा समाजातील तरुणांनी अलका चौकात शरद पवारांचा ताफा अडवला. मात्र, या मराठा आंदोलकांना पोलिसांनी थांबवलं आहे.
माढ्यात अजित पवारांना दाखवले काळे झेंडे
काल (सोमवारी) सोलापूर जिल्ह्यातील माढा येथे विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याच्या ऊस गाळप हंगामाचा शुभारंभ उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आला. दरम्यान यावेळी अजित पवारांना मराठा आंदोलकांकडून काळे झेंडे दाखवण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे.
या कार्यक्रमाच्या वेळी शेतकरी संवाद मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी अजित पवार संबोधनासाठी उभे राहिले आणि त्यांचे भाषण सुरु होताच मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवले. यावेळी पोलिसांनी एका कार्यकर्त्याला ताब्यात घेतलं आहे.
राज्यात मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आंदोलन सुरू आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी आरक्षणाबाबत निर्णय घेण्यासाठी सरकारला दिलेली मुदत आज संपत आहे. यानंतर आपण २५ तारखेपासून कठोर अमरण उपोषण सुरू करणार असल्याचे जरांगे म्हणाले आहेत. यादरम्यान राज्यातील अनके गावांमध्ये राजकीय नेत्यांना गावबंदीचा निर्णय देखील घेण्यात येत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.