sharad pawar congress bhavan pune
sharad pawar congress bhavan puneesakal

Pune Congress Bhavan: जिथे एकेकाळी राज्य केलं त्याच वास्तुमध्ये पवार तब्बल 24 वर्षानंतर भेटीला..

काँग्रेसचा वर्धापन दिन असला तरी चर्चा मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचीच
Published on

आज काँग्रेस पक्षाचा वर्धापन दिन आहे. काँग्रेस सर्व भवन तेजोमय झाले आहेत. आज काँग्रेसचा वर्धापन दिन असला तरी चर्चा मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचीच सुरू आहे. आज पुण्यातील काँग्रेस भवनावर संध्याकाळी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी शरद पवार यांना आमंत्रण देण्यात आलं होतं. हेच आमंत्रण शरद पवार यांनी स्वीकारलं आहे.

sharad pawar to visit pune congress bhavan after 24 years

तब्बल 24 वर्षानंतर शरद पवार पुण्यातील काँग्रेसभवनामध्ये कार्यक्रमासाठी हजज राहणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाल्यानंतर शरद पवार हे पहिल्यांदाच काँग्रेस भवनच्या प्रांगणात पाऊल ठेवणार आहे. शरद पवार यांनी काँग्रेसमधून बाहेर पडल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली होती. त्यानंतर शरद पवार यांनी कधीही पुण्यातील काँग्रेस भवनात गेले नव्हते. काँग्रेस भवनातील कोणत्याही कार्यक्रमाला ते गेले नव्हते. काँग्रेससोबत युती झाल्यानंतरही शरद पवार कधीही काँग्रेस भवनावर गेले नाही.

Also Read - क्रेडिट कार्ड वापरताय...मग या गोष्टी माहिती हव्याच....

sharad pawar congress bhavan pune
Pune Congress: काँग्रेस भवनातील होमहवन नेत्यांना भोवणार? हायकमांड ऍक्शन मोडवर

तब्बल 24 वर्षानंतर शरद पवार तिथे उपस्थित असणार आहेत. पुण्यातील काँग्रेस भवन येथे हा वर्धापन दिन साजरा होणार आहे. त्या कार्यक्रमाला तर उपस्थित राहून शुभेच्छा देणार आहेत. शरद पवार यांनी वर्धापन दिनाला उपस्थित राहावी अशी विनंती काँग्रेस पक्षातील काही पदाधिकाऱ्यांनी केली होती. याच विनंतीला मान ठेवून शरद पवार काँग्रेस भवनावर उपस्थित राहणार आहेत.

sharad pawar congress bhavan pune
Congress News: "2500 किमी चालूनही…"; दिल्लीच्या थंडीत T-Shirtवरील राहुल गांधींचा फोटो NCP नेत्याने केला शेअर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.