Sharad Pawar: मलिदा गँग, बारामती अन् इंदापूर... हर्षवर्धन पाटलांच्या प्रवेशावेळी शरद पवार नेमकं काय म्हणाले?

Harshvardhan Patil Vs Datta Bharane: राज्यातील राजकारण बदलेले असून, सत्ताधारी महायुतीतील अनेकांनी शरद पवार यांच्या पक्षात प्रवेश करण्यासाठी रांग लावली आहे.
Sharad pawar
Sharad Pawaresakal
Updated on

विधानसभा निवडणुकीनंतर राज्यातील राजकारण बदलेले असून, सत्ताधारी महायुतीतील अनेकांनी शरद पवार यांच्या पक्षात प्रवेश करण्यासाठी रांग लावली आहे. अशातच आता बारामतीच्या शेजारच्या इंदापूरमध्ये माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी भाजपमधून शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे.

पाटील यांच्या या प्रवेशावेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी त्यांची इंदापूरातून उमेदवारी जाहीर केली आहे. तर शरद पवार यांनी विद्यमान आमदार दत्ता भरणे यांचे नाव न घेता त्यांना झोडपूण काढले आहे.

यावेळी बोलताना शरद पवार म्हणाले, "राज्यातील सर्वांना बरोबर घेऊन जाण्याच्या हिशोबाने आम्ही इंदापूरातून एका सहकाऱ्याला खूप सधी दिली. छत्रपती कारखान्याचे अध्यक्ष केले, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष केले. पुढे आमदार आणि मंत्रीही केले. पण इथे आल्यानंतर मला वेगळीच परिस्थीती असल्याचे कळाले. अलिकडील काळात निर्माण झालेली ही परिस्तिती ऐकल्यानंतर माझ्यासारख्यालाही धक्का बसला. कारण इंदापूरचे राजकारण, शंकरराव भाऊंचे राजकारण स्वच्छ होते. त्यांनी कधीच कोणाच्या नव्या पैशाचा विचार केला नाही. पण अलिकडे इंदापूरच्या राजकारणाला वेगळी दिशा देण्याचे काम काहीजन करत आहेत."

Sharad pawar
Harshwardhan Patil: सुनेत्रा पवारांच्या पराभवामागे हर्षवर्धन पाटलांचा अदृश्य हात... तुतारी हातात घेताच केला मोठा खुलासा

मलिदा गँगचा उल्लेख

आपले मनोगत व्यक्त करताना शरद पवार म्हणाले की, "मी इथे आल्यापासून पाहतोय की, लोकांच्या हाता काही फलक आहेत. आणि त्या फलकांवर मलिदा गँग असा काहीतरी उल्लेख आहे. मी ही मलिदा गँग बारामतीला पाहिली होती. पण इथेही तशी काही गँग असल्याचे मला काही अधिकाऱ्यांकडून कळाले. मी 55 वर्षांपासून राजकारण करत आहे. त्यामुळे प्रशासनात काही अधिकारी ओळखीचे आहेत. ते या सर्व परिस्थितीवर न बोललेलेच बर असल्याचे म्हणत आहेत."

Sharad pawar
Ladki Bahin Yojana Diwali Payment: लाडक्या बहिणींना दिवाळीपूर्वीच ॲडव्हान्समध्ये मिळणार दोन हफ्ते; अधिकाऱ्यांनी सांगितली तारीख

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.