पुणे : देशाच्या स्वातंत्र्याच्या इतिहासाबरोबरच फाळणीचा इतिहासही शिकवला जावा, असे परिपत्रक केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने काढले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या मनामध्ये कटुतेची भावना निर्माण होईल.
हे योग्य नसून, राज्य शासनाच्या अखत्यारीत हा विषय नसला तरीही केंद्राच्या सीबीएसइला आपली भूमिका कळवावी, असे आवाहन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांना केले आहे.
पुण्यातील सरहद पब्लिक स्कूलच्या नूतन इमारतीच्या उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे,चंद्रकांत पाटील आदी उपस्थित होते. विभाजन विभिषिका नावाने केंद्र सरकारच्या वतीने 14 ऑगस्ट रोजी देशभरात कार्यक्रम घेण्यात आले होते. तसेच याच आशयाचं परिपत्रक सीबीएससी ने काढले होते.
यावर आक्षेप घेत पवार म्हणाले, "राज्यातील अनेक शाळांमध्ये सीबीएसई बोर्डाचा अभ्यासक्रम शिकवला जातो. फाळणीच्या वेळी रक्तरंजित इतिहास घडला. अनेकांना स्थलांतर करावे लागले. हिंदू मुस्लिम दंगली बरोबरच चा इतिहास आहे. त्यामुळे सीबीएससी ने हा विषय शिकवायला नको. राज्य शासनाची यात कोणतीही भूमिका नसली तरी याविषयी बोलायला हवे.
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) विद्यार्थ्यांना देशाच्या इतिहासाबरोबरच फाळणीनंतरच्या समाजाच्या स्थितीची माहिती द्यावी, असे परिपत्रक काढले आहे. फाळणीचा इतिहासात रक्तपाताचा असून, त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये कटुतेची भावना निर्माण होईल.
सामाजिक ऐक्याच्या दृष्टीने हे योग्य नसून, महाराष्ट्र सरकारने सीबीएससीच्या मंडळाला आवाहन करावे, असे मत राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी व्यक्त केले आहे. राज्य सरकारची याच्याशी काहीही संबंध नसला तरी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विसंवाद वाढणार नाही याची काळजी घ्यावी, असेही पवार म्हणाले.
धनकवडी येथील सरहद पब्लिक स्कूलच्या नूतन इमारतीचे उद्घाटन आणि गोपाळ कृष्ण गोखले प्रबोधिनीच्या शुभारंभ समारंभात पवार बोलत होते. यावेळी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, सकाळचे संपादक संचालक श्रीराम पवार, शिक्षण आयुक्त सूरज मांढरे, संजय नहार, संतसिंह मोखा, शैलेश पगारिया आदी उपस्थित होते.
पवार म्हणाले, ‘‘देशातील विविध राज्यातील तरुणांमध्ये एकवाक्यता करण्याचे काम सरहद संस्थेने केले आहे. काश्मीरमधील परिस्थितीचा सर्वाधिक किंमत तिथल्या तरून पिढीला मोजावी लागली आहे. अशा कटुतेतून युवकांना बाहेर काढत देश तुमच्या पाठीशी आहे, अशी भावना निर्माण करणे गरजेचे आहे.’’
काश्मीर आणि पूर्वांचलमधील मुलांना मायेचा आसरा देण्याचे काम संजय नहार यांनी केल्याचे गौरवोद्गार शिंदे यांनी काढले. ते म्हणाले, ‘‘कमकुवत मनांना शिक्षण देऊन समर्थ करण्याचे काम तुम्ही केले असून, राष्ट्र उभारणीच्या कामात सर्वांनाच सहभागी व्हायचे आहे.’’ तर राजकीय पक्षांच्या परिघाबाहेरही काही कामे राहिली पाहिजे, असे मत पाटील यांनी व्यक्त केले. सामाजिक प्रश्नांना शिक्षणातूनच उत्तर देता येईल, असेही ते म्हणाले. नहार यांनी यावेळी संस्थेच्या उभारणीचा प्रवास सर्वांसमोर उलगडला.
गोखलेंच्या भूमिकांचा जागर
गोपाळ कृष्ण गोखले प्रबोधिनीच्या स्थापणे मागची भूमिका श्रीराम पवार यांनी स्पष्ट केली. ते म्हणाले, ‘‘विसाव्या शतकाच्या सुरवातीला पुण्याचे देशाचे नेतृत्व तेले. स्वातंत्र्या नंतर देश कुठल्या दिशेने जायला पाहिजे याचा विचार गोखलेंनी मांडला. त्यांनी जी सूत्रे सांगितली ती देशाच्या घटनेत आली आहे. गोखलेंच्या विचारांचा धार घेऊन ही मूल्य पुढे न्यायला पाहिजे. सामाजिक सुधारणांबाबत ठोस भूमिका त्यांनी घेतले. गोखलेंच्या याच भूमिकांचा जागर नव्या संदर्भात घेण्यासाठी ही प्रबोधिनीची स्थापना होत आहे. केवळ चर्चेपूरते मर्यादित न राहता कृतिशील गट म्हणून प्रबोधिनी कार्य करेल.’’
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.