Sharad Pawar : माळेगावच्या शिवनगर संस्थेत 'रिसर्च कल्चर डेव्हलप' साठी होणारे प्रयत्न कौतुकास्पद-शरद पवार

शिवनगर विद्या प्रसारक मंडळाच्या माध्यमातून शेतकर्‍यांची कुटुंब समृद्ध करणारी विद्या दिली जाते.
Sharad Pawar
Sharad Pawar sakal
Updated on

माळेगाव ः शिवनगर विद्या प्रसारक मंडळाच्या माध्यमातून शेतकर्‍यांची कुटुंब समृद्ध करणारी विद्या दिली जाते. शिवनगर संस्थेत गुणात्मक शिक्षणाबरोबर रिसर्च कल्चर डेव्हल होणारे प्रयत्न कौतुकास्पद आहेत. या प्रक्रियेला बळकटी येण्यासाठी प्रशासनात अर्थिक शिस्त असावी, आधुनिक तंत्रज्ञान वापर व्हावा,

विद्यार्थ्यांना सेवा-सुविधा देणे आणि पदाधिकारी व प्रशासनात समन्वय असणे महत्वाचे आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी वार्षिक सभेत स्पष्ट केले. तसेच त्यांनी पवार चारिटेबल ट्रस्ट मधून शिवनगर संस्थेतील मुलांच्या शिष्यवृत्तीसाठी तीन कोठी रूपयांची देणगी जाहीर केली. प्रतिभा पवार, सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांच्या नावाने ही शिष्यवृत्ती दिली जाणार आहे.

माळेगाव साखर कारखान्याच्या शिवनगर विद्या प्रसारक मंडळाची आज वार्षिक सर्वसाधारण सभा या संस्थेचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अधिपत्याखाली आज पार पडली. यावेळी ते बोलत होते. यंदाच्या शैक्षणिक वर्षात सर्व शाखांमध्ये शंभर टक्के विद्यार्थ्यांचे प्रवेश झाले, टिचिंग व नाॅनटिचींगचे नियमित वेतनासह विविध प्रश्न सोडविले,

गुणात्मक शिक्षणपद्धतीला व प्लेसमेंटला पोत्साहन दिले, प्राध्यापकांच्या गुणवत्तेवर त्यांची इंक्रीमेंट ठरविली, प्रशासकीय कामकाजात पारदर्शकता आणली, सीएसआर फंड स्वीकारण्याची नियमावली पुर्ण केली, येणारी फी आणि अधिकच्या होणार्‍या खर्चाचा मेळ घातला, संस्थेच्या योजनांचा सभासदांच्या ५ हजार ६१३ विद्यार्थ्यांना १० वर्षात लाभ झाला,

अशी अशादायक माहिती संस्थेचे सचिव डाॅ.धनंजय ठोंबरे यांनी बोलून दाखविली. यावेळी उपाध्यक्ष केशवराव जगताप, बाळासाहेब तावरे, रंजन तावरे, मदनराव देवकाते, योगेश जगताप, नितीन सातव, रामभाऊ आटोळे, राजेंद्र ढवाण, अनिल तावरे, स्वप्नील जगताप, सुरेश खलाटे, सुनिल पवार, मंगेश जगताप, गणपत देवकाते, वसंत तावरे, सौ.सिमा जाधव, अजिक्य तावरे यांनी निर्णायक भूमिका मांडली.

शरद पवार यांच्या उपस्थित काही पदाधिकार्‍यांनी विविध आक्षेपार्य़ मुद्दे निदर्शनास आणून दिले. त्यामध्ये टिचींग आणि नाॅन स्टाफची झालेली नोकर भरती नियमाला धरून नाही, सभासद व माजी पदाधिकाऱ्यांकडे फीच्या माध्यमातून थकित १७ कोटी रुपये येणे आहे, प्राध्यापकांचे चुकीच्या झालेल्या प्रमोशनमुळे संस्थेला अर्थिक तोटा झाला आदी मुद्दांचा समावेश होता.

तोच धागा पकडत पवार म्हणाले, `` टिचींग व नाॅन टिचींग स्टाफ हा प्रशासनाने नव्हे तर तुम्ही पदाधिकार्‍यांनी भरला. आता तुम्हीच म्हणता हे चुकीचे आणि अर्थिक नुकसानिचे झाले. हे बरोबर नाही. या विषयाचा स्वतंत्र अहवाल तयार करण्याची जबाबदारी सचिवांना देतो. तसेच सभासद व पदाधिकाऱ्यांकडे १७ कोटींची फी थकित असणे संस्थेच्या दृष्टीने अर्थिक अडचणीचे आहे.

त्यामुळे ही मोठी रक्कम वसूल करण्यासाठी सहाजणांची कमीटी नेमतो. त्यामध्ये रंजन तावरे, योगेश जगताप, रामभाऊ आटोळे, नितीन सातव, राजेंद्र ढवाण, मदनराव देवकाते यांचा समावेश असेल.`` यावेळी बारामतीमधील उद्योजकांच्या अर्थिक मदतीतून सहा लाख रुपय खर्च करून उभारलेल्या संगणक लॅबचे उद्घाटन पवार साहेबांच्या हस्ते झाले.

आणि पवारसाहेबांनी केले अभिनंदन

शिवनगर शिक्षण संस्थेने डिजिटल प्लॅटफार्म तयार करून या संस्थेचे मार्केटींग अधिक चांगले करावे, त्याचा प्रवेश प्रक्रियेला फायदा होणार आहे. तसेच नॅशनल इन्स्टीटयूट रॅंकिंगमध्ये संस्थेचा क्रमांक वाढविण्यास मदत होणार आहे. त्यासाठी सचिव डाॅ. धनंजय ठोंबरे चांगले प्रयत्न करीत आहेत, अशी माहिती नितीन सातव यांनी दिली आणि पवार साहेबांनीही लागलीच प्रशासनाचे अभिनंदन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.